लिंग बदलासाठी बीडच्या लेडी पोलिसानं केला सुट्टीचा अर्ज, पोलीस आधिकाऱ्यांसमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 01:35 PM2017-11-19T13:35:14+5:302017-11-19T15:00:03+5:30

जिल्हा पोलीस दलातील एक 27 वर्षीय महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून, येत्या पंचवीस तारखेला तिच्यावर जे.जे.रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे

Beed's Lady police for gender change made the holiday application before the police officials | लिंग बदलासाठी बीडच्या लेडी पोलिसानं केला सुट्टीचा अर्ज, पोलीस आधिकाऱ्यांसमोर पेच

लिंग बदलासाठी बीडच्या लेडी पोलिसानं केला सुट्टीचा अर्ज, पोलीस आधिकाऱ्यांसमोर पेच

Next

बीड - जिल्हा पोलीस दलातील एक 27 वर्षीय महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून, येत्या पंचवीस तारखेला तिच्यावर जे.जे.रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.बीड पोलीस दलातील एका महिला पोलिसाने आपण पुरुष असल्याचे सांगत ,लिंग बदल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी तिने रजेसाठीही अर्ज केला आहे. 

मात्र अद्याप या अर्जावर महासंचालकाने कुठलाही निर्णय घेतला नाही. सदर महिला पोलीस लिंगबदलावर ठाम असून , नौकरीची पर्वा न करता,  लिंग बदल करण्याच्या निर्णयावर ती ठाम आहे. मुंबईत कायदा तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर ,तिने हा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात तिच्यावर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्यावरील उपचाराच्या खर्चाची जबाबदारी काही नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली आहे...

23 जून रोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कॉन्स्टेबलची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला. अशा कारणासाठी पहिल्यांदाच अर्ज आल्यानं त्यावर काय निर्णय घ्यावा या विचारात वरीष्ठ पोलीस अधिकारी आहेत.

तिची निवड महिला गटातून झाल्याने नोकरीवर पाणी सोडावे लागेल, असं पोलिस अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. मात्र लिंग बदलानंतर पुन्हा शारीरिक चाचणी घेऊन त्यांना पोलिसामध्ये राहता येईल, असं तिच्या वकिलांनी सांगितलं. अहमदाबादमध्येही अशी घटना घडल्याचा दाखला त्यांनी दिला.

सध्या पोलिस खात्यात या संपूर्ण प्रकारावर निर्णय घेताना वरिष्ठ अधिकारी कुठल्याच निर्णयापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे सुट्टीसाठीच्या या किचकट अर्जावर पोलिस खातं काय निर्णय घेतं, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Web Title: Beed's Lady police for gender change made the holiday application before the police officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस