बीडमध्ये रूग्ण नसलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:53 AM2019-01-30T00:53:20+5:302019-01-30T00:53:41+5:30

रूग्ण नसतानाही मद्यपान करून सायरन वाजवित आलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले. हातगाडा आडवा आल्याने त्या दोन्ही महिला किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावल्या.

In Beed, a speeding asswife blew up two women | बीडमध्ये रूग्ण नसलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले

बीडमध्ये रूग्ण नसलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रूग्ण नसतानाही मद्यपान करून सायरन वाजवित आलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले. हातगाडा आडवा आल्याने त्या दोन्ही महिला किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावल्या. ही घटना जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीच्या पाठीमागे मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली.
प्रेमा जाधव (रा.मुंबई) व पार्वती माने (रा.चांदेगाव ता.बीड) असे जखमी महिलांचे नावे आहेत. पार्वती माने यांच्या नातेवाईकाचे अ‍ॅपेंडेक्सची शस्त्रक्रिया झालेली असून त्यांचा रूग्ण वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेत आहे. या रूग्णाला भेटण्यासाठीच प्रेमा जाधव या मुंबईहून आल्या होत्या. रूग्णासोबत गप्पा झाल्यानंतर त्यांना काहीतरी खायला घेऊन जाण्यासाठी ते रूग्णालयाबाहेर आल्या. एका हातगाड्यावर खरेदी करीत असतानाच रूग्ण नसलेली रूग्णवाहिका (एमएच २० डब्ल्यू ९६६२) भरधाव वेगात आली. बाजुला दुसरी रूग्णवाहिका असल्याने चालकाने वाहन थेट हातगाड्यावर घातले. हातगाडा पूर्णपणे मोडून दोन महिलांना उडविले. यामुळे दोन्ही महिला बाजूच्याच नाल्यात पडल्या. यामध्ये दोघींच्याही पाय, हात आणि कमरेला गंभीर जखम झाली. त्यांना जवळीच नागरिकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सुदैवाने हातगाडा आडवा असल्याने या दोन्ही महिलांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे ऐकावयास मिळाली.
विशेष म्हणजे रूग्णवाहिकेचा चालक आणि त्याचा मित्र मद्यपान केल्याचे सांगण्यात आले. खरा चालक बाजूला बसला होता तर त्याचा मित्र रूग्णवाहिका चालवित होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रूग्ण नसतानाही नशेत त्यांनी सायरण लावला होता आणि रूग्णवाहिका भरधाव वेगाने नेली जात होती. याचवेळी हा अपघात झाला. त्यानंतर याच चालकाने नागरिकांना उद्धट भाषा वापरली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी येथे पोलीस चौकी आहे. मात्र घटनेच्यावेळी याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. याबाबत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याला आदेश देत तात्काळ कर्मचारी पाठविले. दरम्यान, सोमवारी केवळ पाच तासांत तीन दुचाकी चोरी गेल्या होत्या. आणि मंगळवारी घटनेच्यावेळी पोलिसांची अनुपस्थिती यावरून चौकीतील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर येतो.
उशिरापर्यंत तक्रार
दाखल नाही
अपघातात जखमी झालेल्या महिलांनी तक्रार देऊ नये, यासाठी २३ क्रमांकाच्या कक्षात काही चालकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर दबावही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रूग्णालयातील कर्मचारी इतर सुजान नागरिकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. तरीही रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झालेली नव्हती.

Web Title: In Beed, a speeding asswife blew up two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.