बीडमध्ये एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे कागदोपत्री झाली वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:14 AM2019-01-17T00:14:45+5:302019-01-17T00:16:37+5:30

बीड पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या वृक्ष लागवड संगोपन कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. झाडे नसताना देखील मजुरांच्या नावाखाली लाखों रुपये उचलल्याचे प्रकार देखील समोर आले होते

Beed has drought over one, and on the other hand, planted trees | बीडमध्ये एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे कागदोपत्री झाली वृक्ष लागवड

बीडमध्ये एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे कागदोपत्री झाली वृक्ष लागवड

Next
ठळक मुद्देरोहयो कामात गैरव्यवहार : ६६ ठिकाणी आढळून आली कमी झाडे; संबंधितांवर होणार कारवाई

बीड : बीडपंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या वृक्ष लागवड संगोपन कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. झाडे नसताना देखील मजुरांच्या नावाखाली लाखों रुपये उचलल्याचे प्रकार देखील समोर आले होते. या सर्व वृक्ष लागवड संगोपन कामांची तपासणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेवरुन करण्यात आली. यामध्ये ८० कामांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी प्रमाणापेक्षा झाडे कमी आढळून आल्यामुळे कामे बंद करण्यात आली आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वृक्ष लागवड संगोपनाच्या नवीन कामांना मंजुरी न देण्याचे आदेश जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते. जुन्या कामांची देखील पाहणी करुन ६० टक्क्यापेक्षा अधिक वृक्ष असतील तरच काम सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना जवळपास एक महिन्यापूर्वी सर्व पंचायत समित्यांना दिल्या होत्या. याच संदर्भात विविध विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचे ६ पथके नेमून त्यांच्या माध्यमातून बीड पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवड संगोपनाची कामे तपासली होती. रविवारी याचा अहवाल देण्यात आला. यामध्ये ८० कामे तपासली होती.
त्यापैकी जवळपास ६६ कामांवर वृक्ष लागवड संगोपनाची कामे दिसली नाहीत. तर काही ठिकाणी ६० टक्क्यांपेक्षा कमी लागवड होती. त्यामुळे ही ६६ कामे बंद करण्यात आली आहेत. १४ ठिकाणी समाधानकारक काम असलमुळे ही कामे सुरु ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी बीड पंचायत समिती मधील कृषी अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी व बीडीओ आर.जी शिनगारे यांच्यासह इतर संबंधित अधिकाºयांवर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
झाडे नसतानाही झाला खर्च
रोहयोच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्ष लागवड संगोपण योजनेच्या साइटवर झाडे नसताना देखील मजुरी कशाच्या आधारावर दिली जात होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे संबंधित ग्रामसेवक, ग्रामरोजगारसेवक, विस्तार अधिकारी, सरपंच व वनविभागाच्या अधिकाºयांवर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
रोहयो विभागातील कर्मचारी बदलण्याच्या मागणीवर जोर
बीड पंचायत समितीमधील रोहयो विभागातील कंत्राटी कर्मचारी व इतर अधिकारी देखील यामध्ये दोषी आहेत. या कार्यालयात शिस्त नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही. तसेच अनेक वेळा खासगी व्यक्ती देखील आपले मस्टर त्या कर्मचाºयांच्या उपस्थिती व अनुपस्थितीमध्ये त्यांच्या संगणकावर भरुन घेतो. त्यामुळे येथील कंत्राटी आॅपरेटर बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Beed has drought over one, and on the other hand, planted trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.