बीड जिल्ह्यात २३ हजार ५५३ शेतकरी अनुदानास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:48 PM2018-06-18T23:48:18+5:302018-06-18T23:48:18+5:30

बीड जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर हमीदराने तूर आणि हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी आॅनलाईन नोंदणी केलेल्या २३ हजार ५५३ शेतकरी वंचित राहिले. हे शेतकरी आता शासनाच्या निर्णयानुसार अनुदानाच्या कक्षेत आले आहेत. या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

In Beed district, 23 thousand 553 farmers are eligible for subsidy | बीड जिल्ह्यात २३ हजार ५५३ शेतकरी अनुदानास पात्र

बीड जिल्ह्यात २३ हजार ५५३ शेतकरी अनुदानास पात्र

Next
ठळक मुद्देनोंदणी केलेल्या वंचितांना मिळणार १ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान

बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर हमीदराने तूर आणि हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी आॅनलाईन नोंदणी केलेल्या २३ हजार ५५३ शेतकरी वंचित राहिले. हे शेतकरी आता शासनाच्या निर्णयानुसार अनुदानाच्या कक्षेत आले आहेत. या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासनाने उडीद, तूर, हरभरा नाफेडच्या माध्यमातून हमीदराने खरेदी केला. १ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु झाली होती. मात्र सुरुवातीपासूनच बारदान्याचा तुटवडा आणि अपुºया गोदामामुळे अडचणी येत राहिल्या. यावर्षीही तुरीचे बंपर पीक आल्याने खरेदी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होत राहिली. तीन वेळा खरेदी थांबवून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. १५ मेपासून तूर खरेदी बंद करण्यात आली. ३३ हजार ६०७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ५४४ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली.

जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. या खरेदी प्रक्रियेतही अनेकवेळा गोंधळ आणि अडचणी निर्माण झाल्या. १३ जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली. यावेळी आॅनलाईन नोंदणी केलेल्या परंतू खरेदी न झालेल्या तूर व हरभºयासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदानाची घोषणा करुन शासनाने शेतकºयांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.

तुरीचे १२ हजार ६३ शेतकरी वंचित
तुरीसाठी ३३ हजार ६०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ५४४ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली. १२ हजार ६३ शेतकरी वंचित राहिले आहेत.

पीकपे-याआधारे अनुदान
हमी केंद्रावर तूर, हरभरा विक्रीसाठी शेतकºयांना दहा क्विंटलपर्यंत मर्यादा निश्चित केली होती. आता आॅनलाईन नोंदणी केलेल्या वंचित शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार रुपये शासनाच्या निर्णयाप्रमाणे अनुदान मिळणार आहे. यासाठी आकस्मिक निधी उपलब्ध केला आहे. नोंदणी करताना दिलेल्या पीक पेºयाआधारे ते मिळेल अशी प्राथमिक माहिती आहे.

गोदाम तुरीने भरलेले : हरभरा उघड्यावर
नाफेडच्या केंद्रावर १४ मेपर्यंत २१ हजार २२७ शेतकºयांची २ लाख १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली होती. यातील १ लाख १ हजार क्विंटल तूर गोदामात पाठविण्यात आली होती. तर १३ जूनपर्यंत २० हजार ९५६ शेतकºयांचा २ लाख ९१ हजार ४४५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी ३७ हजार ७८ क्विंटल हरभरा गोदामात पाठविता आला. उर्वरित २ लाख ५३ हजार ४७५ क्विंटल हरभरा उघड्यावर असून गोदाम उपलब्धतेनुसार पाठविला जात आहे.

Web Title: In Beed district, 23 thousand 553 farmers are eligible for subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.