बीडमध्ये मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:41 AM2019-04-17T04:41:21+5:302019-04-19T15:55:04+5:30

बीड लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे.

Become the leader of the Munde family in Beed | बीडमध्ये मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला

बीडमध्ये मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला

Next

बीड लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे. शिवाय, या लढतीला मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वादाची किनार लाभल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रेल्वे आणि राष्टÑीय महामार्ग
विविध योजनांतून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणलेला निधी, अहमदनगरकडून बीडच्या वेशीत आलेला रेल्वेमार्ग, बीड जिल्ह्यात पूर्ण झालेले आणि चालू असलेल्या दहा राष्टÑीय महामार्ग, जलसंधारणाची कामे, ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, बीडमध्ये आणलेले पासपोर्ट कार्यालय, सुरू केलेल्या साडेआठशे चारा छावण्या, एअर स्ट्राइक हेच भाजपच्या प्रचारात प्रमुख मुद्दे होते.
सरकारच्या कारभारावर हल्लाबोल
राष्टÑवादीने आपल्या प्रचारात राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवर रान उठविले, तसेच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरही प्रचारात भर दिला. पाच वर्षांत अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे पूर्ण न करता आल्याबद्दल सरकारला जाब विचारला, तर चारा छावण्यात राजकारण आणल्याबद्दल टीका केली.
>हेही उमेदवार रिंगणात
विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी), स. मुज्जमील स.जमील (सपा), अशोक थोरात (हम भारतीय पार्टी), कल्याण गुरव (भारतीय सुराज्य पक्ष), गणेश करांडे (महाराष्टÑ कांती सेना), रमेश गव्हाणे (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), चंद्रप्रकाश शिंदे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), सादेक मुनीरोद्दीन शेख (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) यांच्यासह २६ अपक्ष असे एकूण ३६ उमेदवार आहेत.

Web Title: Become the leader of the Munde family in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.