दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:20 AM2019-05-07T00:20:21+5:302019-05-07T00:22:11+5:30

दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत.

Bead's obstacles in the market due to drought | दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार

दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आठ कोटींच्या उलाढालीला फटका : धान्याची आवकच नाही, व्यापारी, अडते, हमाल, कामगारांच्या ८०० कुटुंबांना फटका

अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत बाजारात ४० टक्केच मालाची आवक झाली.
खरीप हंगामात तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरीची पिके बीड व तालुक्यातील शेतकरी घेतात. याशिवाय उसाचे क्षेत्रही आहे. तर रबी हंगामात गहू, ज्वारी आणि हरभरा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बीड बाजार समितीमध्ये ७२ आडत दुकाने आहेत. तर नेकनूर, चौसाळा आणि पिंपळनेर येथे उपबाजारपेठा नावालाच आहे.
२०१७-१८ मध्ये येथील बाजारात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका इ. मालाची समाधानकारक आवक झाली. सरासरी भाव पाहता १७ कोटी १८ लाख ८९ हजार ८५६ रुपयांची उलाढाल झाली. याशिवाय मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, तूर, हरभरा आदी मालाची ४ लाख ४५ हजार १९४ क्विंटल शासकीय खरेदी झाली आहे. तर २०१८-१९ मध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद, मूग, तूर, मका, सोयाबीन, चिंच आदी मालाची ३५ हजार ६१५ क्विंटल आवक झाली. सरासरी भावानुसार ९ कोटी २३ लाख २५ हजार ४०८ रुपयांची उलाढाल झाली.
या दोन वर्षातील तुलना केल्यास २०१८-१९ मध्ये ७ कोटी ९५ लाख ६४ हजार ४४८ रुपयांच्या उलाढालीला फटका बसला आहे. धान्य बाजारात आले नाही. त्यामुळे व्यापार, सौदे झाले नाही. परिणामी बाजार समितीला मिळणाºया उत्पन्नातही ५० टक्के घट झाली आहे.
बीड सारख्या बाजारपेठेत ग्रेडिंग मशीन व प्रशिक्षित ग्रेडर नाही. होणारी प्रतवारी देखील विश्वसार्ह आवश्यक आहे. मात्र, सुविधांअभावी आॅनलाईन व्यापारी पद्धत फोल ठरणार आहे.
बीडचा मोंढा बाजार : ठळक वैशिष्ट्ये
२० वर्षांपूर्वी येथील मोंढ्यात ५ ते ७ हजार क्विंटल धान्याची आवक होत असते. सध्या १०० क्विंटल आवक होत आहे.
धने, जवस, करडई, सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत. नंतर बहुतांश शेतकरी कापसाकडे वळले. उत्पादनच नसल्याने आता हा माल आडतीवर येत नाही.
मोठ्या प्रमाणात आवक आणि उलाढालीमुळे बीडच्या मोंढ्यात ३०० हमालांना रोजगार मिळत होता. दिवसेंदिवस आवक घटल्याने उलाढालीवर परिणाम झाला. सध्या २५ हमाल येथे काम करतात.
मापाडीदेखील जवळपास ४० होते. फारसे काम नसल्याने ही संख्या रोडवली असून ८ ते १० मापाडीच काम करतात.
बीडच्या मोंढ्यात दिवसाकाठी ६०० ते ७०० रुपये रोज मजुरी मिळायची, त्यामुळे एम. ए. बी. कॉम. झालेले तरुणही येथे हमाली कामासाठी येत. मात्र कामच नसल्याने बाजाराकडे फारसे कोणी फिरकत नाही.
मोंढ्यात साडेदहा वाजता झेंडा लागायचा, दुपारी २ वाजेपर्यंत लिलाव व्हायचे. मात्र दुष्काळामुळे धान्याची आवक नसल्याने ही प्रक्रिया अर्ध्या तासातच पूर्ण होते.

Web Title: Bead's obstacles in the market due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.