पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:38 PM2018-10-17T18:38:46+5:302018-10-17T18:39:32+5:30

योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली.

After the Purnahuti Mahapuja, a crowd of devotees to visit Yogeshwari Devi | पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड ) : योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली. तहसीलदार संतोष रुईकर यांनी पत्नी  कमल सोबत योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. 

१० ऑक्टोबर ते  १८ आॅक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात पुर्णाहुती व होमहवन होऊन महापुजा झाली. देवल कमेटी चे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर व सौ. कमल रुईकर   यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी देवल कमिटीचे  सचिव  भगवानराव शिंदे, मुख्यपूजारी सारंग पुजारी.विश्वस्त  पृथ्वीराज साठे,कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, उल्हास पांडे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा.अशोक लोमटे, संजय भोसले,पूजा राम कुलकर्णी,गौरी जोशी,श्रीराम देशपांडे, पुरोहित,मानकरी व भाविक उपस्थित होते.  

गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दूरदूर ठिकाणाहून लोक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना विविध सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. 

देवीच्या पालखीने महोत्सवाची होणार सांगता
श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता गुरुवारी विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी एक वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने पालखीचे मार्गक्रमण होणार आहे. 

दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्र्यांचे साकडे 
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणा साठी देवीला साकडे घातले. यावेळी खा. डॉ.प्रितम मुंडे,आ.संगीता ठोंबरे, गयाबाई कराड यांची उपस्थिती होती.

Web Title: After the Purnahuti Mahapuja, a crowd of devotees to visit Yogeshwari Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.