पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर दुसरी मुलगी झाली; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:06 AM2018-12-21T00:06:37+5:302018-12-21T00:07:02+5:30

दोन वर्षांपूर्वी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसरी मुलगीच झाल्याने विवाहितेचा सासरी छळ सुरु झाला. त्यानंतर माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सतत मारहाण होऊ लागल्याने विवाहितेने अखेर पोलिसात धाव घेतली व नवऱ्यासह सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार दिली.

After the death of the first child, another daughter was born; Married to mother-in-law | पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर दुसरी मुलगी झाली; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर दुसरी मुलगी झाली; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Next
ठळक मुद्देपाच जणांविरुद्ध माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : दोन वर्षांपूर्वी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसरी मुलगीच झाल्याने विवाहितेचा सासरी छळ सुरु झाला. त्यानंतर माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सतत मारहाण होऊ लागल्याने विवाहितेने अखेर पोलिसात धाव घेतली व नवऱ्यासह सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार दिली.
शारदा उत्तम चव्हाण (रा. पोई तांडा, ता. गेवराई) असे त्या विवाहितेचे नाव आहे. २००४ साली माजलगाव तालुक्यातील झिंजुर्डी तांडा येथील शारदाचे लग्न उत्तम जेमा चव्हाण याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर त्यांना एका मुलगा आणि एक मुलगी झाली. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी त्यांचा १३ वर्षीय मुलगा पृथ्वीराज याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मुलगा व्हावा या अपेक्षेने शारदाचे आॅपरेशन करण्यात आले. परंतु तिला मुलगी झाली. त्यामुळे शारदाचा सासरी छळ सुरु झाला. तिच्या माहेरच्या लोकांनी त्यांची समजूत घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पहिला. त्यानंतर दोन लाख घेऊन ये अन्यथा तुला नांदवणार नाहीत म्हणून तिला मारहाणही करण्यात येऊ लागली. सततचा छळ असह्य झाल्यामुळे अखेर शारदाने माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पती उत्तम जेमा चव्हाण, सासू चांगूबाई, सासरा जेमा देऊ चव्हाण, दीर बाळासाहेब आणि जाऊ गीतांजली बाळासाहेब चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: After the death of the first child, another daughter was born; Married to mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.