व्यापाऱ्याला लुटणारा अर्ध्या तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:12 AM2019-04-30T01:12:36+5:302019-04-30T01:13:39+5:30

मोंढा भागामधून व्यापा-याची बॅग लुटून पळून जाणा-या दोघांपैकी एकाला अर्ध्या तासातच जेरबंद करण्यात आले.

Accused arrested in 30 minutes after robbery | व्यापाऱ्याला लुटणारा अर्ध्या तासात जेरबंद

व्यापाऱ्याला लुटणारा अर्ध्या तासात जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील मोंढा भागामधून व्यापा-याची बॅग लुटून पळून जाणा-या दोघांपैकी एकाला अर्ध्या तासातच जेरबंद करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली. बॅग आणि त्यातील रोख रक्कमही सुरक्षित राहिली.
येथील संजय मुलचंद अब्बड यांचा किराणा आणि तेलाचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास दुकान बंद करुन बॅग घेऊन घरी निघाले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अब्बड यांची बॅग हिसकावली. यामध्ये १ लाख ८३ हजार रुपये होते. हा प्रकार घडताच अब्बड यांनी आरडाओरडा केला. तसेच पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तसेच रविवारी झालेल्या चोरीच्या घटनेप्रकरणी तपासासाठी गेलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल धस, माजलगावचे एएसआय पवार आणि सहका-यांनी नियोजन करुन शहरात नाकाबंदी केली. अर्ध्या तासातच इदगाह रोड भागात सोन्या उर्फ केदारनाथ नागूराव दराडे (वय २७, रा. फुलेनगर) याला बॅगसह ताब्यात घेण्यात आले. त्याचा सहकारी मात्र पसार झाला. त्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी संजय अब्बड यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
लुटीनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलविली. नागरिकांनीही सहकार्य केले. त्यामुळे अर्ध्या तासात आरोपीला बॅग व रकमेसह पकडण्यात यश आले.

Web Title: Accused arrested in 30 minutes after robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.