छावणीच्या देयकासाठी ८४ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:02 AM2019-06-12T00:02:13+5:302019-06-12T00:02:44+5:30

जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे.

84 crores grant for encroaching camp | छावणीच्या देयकासाठी ८४ कोटींचे अनुदान

छावणीच्या देयकासाठी ८४ कोटींचे अनुदान

Next
ठळक मुद्दे२५ टक्के रक्कम कपात करुन वाटप : ११५ कोटींची करण्यात आली होती मागणी

बीड : जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्याचे वाटप तात्काळ केले तर चारा छावणी चालकांना दिलासा मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४ लाखापेक्षा अधिक पशुधन आश्रयास आहे. त्यांची देयके अदा करण्यासाठी सुरुवातील १०३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शासनाने छावणी चालकांच्या अनुदानात वाढ केली होती. त्यामुळे वाढीव दराने अनुदान देण्यासाठी देखील २१ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.
‘मे’ च्या अनुदान वाटपासाठी ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. यामधील प्रशासकीय खर्चासाठी २१ कोटी २० लाख ९३८ रुपये राखीव ठेऊन ही उर्वरीत अनुदान वाटप करण्यात येणार आहे. मात्र, काही छावण्यांमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाल्यामुळे २५ टक्के रक्कम राखीव ठेऊन अनुदान वाटप करण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या अनुदानाचे वाटप प्रशासनाकडून तात्काळ वाटप करावे कारण चारा बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून खरेदी करावा लागत आहे, तसेच इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हे अनुदान मिळाले तर काही प्रमाणात चारा छावणी चालकांना दिलासा मिळेल. दरम्यान, अनुदानामधून २५ टक्के रक्कम कपात करू नये, या मागणीसाठी छावणी चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Web Title: 84 crores grant for encroaching camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.