मोफत शिबिरात ६५ रुग्ण तपासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:37 AM2018-12-22T00:37:02+5:302018-12-22T00:38:16+5:30

 जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू, नाक, कानावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील बाह्यविकृती सारख्या व्यंगावर भव्य मोफत तपासणी व प्लॅस्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारी ६५ रुग्णांची तपासणी झाली.

65 camps were checked in the free camp | मोफत शिबिरात ६५ रुग्ण तपासले

मोफत शिबिरात ६५ रुग्ण तपासले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड :  जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू, नाक, कानावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील बाह्यविकृती सारख्या व्यंगावर भव्य मोफत तपासणी व प्लॅस्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारी ६५ रुग्णांची तपासणी झाली.
मुंबई येथील जर्मन फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, विवेकांनद हॉस्पिटलने शिबिराचे आयोजन केले असून पत्रकार भवनात तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. मुंबईचे डॉ.रंगनाथ झावर बीडचे डॉ.रोहीत तोष्णीवाल, डॉ.सचिन जेथलिया, डॉ.संदीप येवले, डॉ.राजेंद्र सारडा यांनी रुग्णांची तपासणी केली. १ ते ५८ वर्षापर्यंतच्या रुग्णांनी तपासणी करुन घेतली. बीडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण या शिबिरासाठी आले होते. २२ व २३ डिसेंबर रोजी विवेकांनद हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे.

Web Title: 65 camps were checked in the free camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.