बीडमध्ये ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:37 AM2018-05-19T00:37:47+5:302018-05-19T00:37:47+5:30

धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे.

521 cheaper grains in the bead have been issued to the shoppers | बीडमध्ये ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना बजावली नोटीस

बीडमध्ये ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना बजावली नोटीस

Next
ठळक मुद्देजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळला ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे.

स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळा बाजार होत असल्याचे समोर आले होते. याला आळा घालण्यासाठी वितरण व्यवस्था आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी सर्व शिधापत्रिका धारकांची व कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन आधार नोंदणी करण्यात आली. ग्राहकांना ई-पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी स्वस्त धान्य पुरवठा करणा-या दुकानदारांना केल्या होत्या. मात्र, या सूचनेला बासनात गुंडाळून ठेवत स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापरच केला नाही.

ही बाब जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या निदर्शनास अल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याची नोटीस या दुकानदारांना दिली आहे. एप्रिल महिन्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी वितरण असणा-या दुकानांना वितरण वाढवण्याच्या सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच जर वितरण वाढले नाही तर कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

ई-पॉस पावतीचा ग्राहकांनी धरावा आग्रह
धान्य वितरण केल्यानंतर ई-पॉस मशिनद्वारे पोचपावती मिळते, शिधापत्रिका धारकांनी धान्य घेतल्यानंतर ही पोचवापवती घेण्याचे व दुकानदारांनीही देण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिका-यांनी केले आहे. पोचपावती न देणा-या दुकानदारांची लेखील तक्रार जिल्हा पुरवठा कार्यालय किंवा तहसिल कार्यालयात करावी.

ई-पॉस मशिनमुळे पारदर्शकता
पुरवठा विभागामधून स्वस्त धान्यांचा होणार काळा बाजार ई-पॉस मशिनमुळे थांबणार आहे. तसेच पारदर्शक व सुळीत कारभार होण्यास मदत होणार आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून जेवढे धान्य वाटप केले जाईल त्याचा संपुर्ण डेटा संग्रहीत केला जात आहे. त्यामुळे धान्य काळ््या बाजारत विकण्यावर प्रतिबंधयेईल व पुरवठा विभागातील धान्याचा अपहार थांबेल.

कठोर कारवाई करु
या महिन्यात ई-पॉस मशिनद्वारे ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरण करणा-या स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच ई-पॉसची पावती दिली नाही किंवा याविषयी तक्रारी आल्या तरी देखील कठोर कारवाई केली जाईल. अशा सूचना स्थानिक पातळीवरील कार्यालयांना दिल्या आहेत.
- ए. टी. झिरवाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड

Web Title: 521 cheaper grains in the bead have been issued to the shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.