महिलेवरील हल्लाप्रकरणी ५ वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:21 AM2018-10-23T00:21:28+5:302018-10-23T00:22:01+5:30

वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली.

5 years' right to face attack on woman | महिलेवरील हल्लाप्रकरणी ५ वर्ष सक्तमजुरी

महिलेवरील हल्लाप्रकरणी ५ वर्ष सक्तमजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली.
शेलापुरी येथील जनाबाई आश्रुबा नाईकनवरे (६५) या ४ एप्रिल २०१५ रोजी मंगलनाथ मंदिराकडून बायपास रोडने पायी घरी जात होती. त्यावेळी गोकुळ कदम याने मी तुम्हाला सोडतो असे म्हणून त्या वृद्ध महिलेस दुचाकीवर बसवून नेले. घरी गेल्यावर चहा पिल्यानंतर गोकुळने अचानक त्याच्या जवळची कत्ती बाहेर काढून ती ठेवण्यासाठी पिशवीची मागणी सदर महिलेकडे केली. पिशवी घेवुन येताच महिलेच्या मानेवर व जबड्यावर कत्तीने वार केला. यात महिला गंभीर जखमी झाली.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या जबाबावरु न गोकुळविरु द्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होते. तपासानंतर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात ८ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्यावरु न सत्र न्या. अरविंद एस.वाघमारे यांनी आरोपी गोकुळ राम कदम यास दोषी धरु न शिक्षा सुनावली. या प्रकरणी पैरवी अधिकारी जालिंदर वाव्हळकर, सरकारी वकील अ‍ॅड. अजय तांदळे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

Web Title: 5 years' right to face attack on woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.