गेवराई तालुक्यात ३०० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 03:50 PM2019-06-29T15:50:17+5:302019-06-29T15:52:25+5:30

काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात मोठी कारवाई केली होती

300 Brass caught illegal sandstone in Gevrai taluka | गेवराई तालुक्यात ३०० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

गेवराई तालुक्यात ३०० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

Next

गेवराई (बीड ) : तालुक्यातील गुळज,गुंतेगाव,बोरगावं शिवारातील अवैध वाळूसाठ्यावर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कारवाई करत जवळपास 300 ब्रास साठा सोमवारी जप्त केला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील राजापुर येथे कारवाई करून अवैधरित्या जमा केलेला मोठा वाळूसाठी जप्त केला होता. 

मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, पि.एस वाटुरे, कमलेश सुरावर यांना तालुक्यातील गुळज, गुंतेगावं तसेच बोरगांव शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूसाठा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. यावरून कारवाई करत त्यांनी जवळपास ३०० ब्रास वाळूसाठा जप्त केला. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई मुळे अवैधवाळू उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. 

Web Title: 300 Brass caught illegal sandstone in Gevrai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.