सततच्या छेडछाडीला कंटाळून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:08 PM2019-01-24T13:08:56+5:302019-01-24T13:12:35+5:30

या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16-year-old girl committed suicide due to constant stray | सततच्या छेडछाडीला कंटाळून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देराहत्या घरी विषारी औषधी प्राशन केले उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू

वडवणी (बीड ) : सततच्या छेडछाडीस कंटाळून कंटाळून एका 16 वर्षीय मुलीने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना ८ जानेवारीस तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथे घडली होती. या मुलीचा मंगवारी (दि. २२ ) जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील स्वाती गोविंद राठोड (१६) ही नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. स्वाती शाळेत जाताना अमर तिडके ( रा.भोगलवाडी ) व हनुमान सावंत (रा. उपळी हल्ली मुक्काम तेलगाव ) हे तिची सातत्याने छेड काढत. याला कंटाळून स्वातीने दि. ८ जानेवारीस राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर तिला बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ, उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२२) दुपारी 1 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी स्वातीचे वडील गोविंद किसन राठोड यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिस ठाण्यात अमर तिडके व हनुमान सावंत या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए एस सिध्धीकी हे करत आहेत.

Web Title: 16-year-old girl committed suicide due to constant stray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.