छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:26 AM2019-02-08T00:26:44+5:302019-02-08T00:27:34+5:30

तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

156 proposals for camping; But not allowed | छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही

छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही

Next
ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील स्थिती : पंचायत समितीकडे १०३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव दाखल तर ९५ टँकर मंजूर

अविनाश कदम।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. परंतु अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातुन आलेले सर्व प्रस्ताव शासनाने मंजूर केले तर शेतकऱ्यांवर आलेले संकट काही प्रमाणात कमी होईल.
आष्टी तालुक्यामध्ये आजमितीस ९५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर तालुकाभरातून १०३ टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी २२ प्रस्ताव मंजुरीसाठी कार्यालयात पडून आहेत. तालुक्यात यावेळी पर्जन्य कमी पडल्याने सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, धामणगाव, पिंपळा, टाकळसिंग, दौलावडगाव या सात महसूल मंडळात पाणी व चाºयाचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. तालुक्यात गुरांची छावणी अद्याप पर्यंत झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी आपली जनावरे बाजारात विकली आहेत.
छावणीविना जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही
आमच्या गावात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई आहे गावात टँकर सुरू आहे परंतु जनावरांना आम्ही चारा कोठून आणायचा शासनाने आमच्या मांडवा गावात छावणी सुरू केल्यास आमची जनावरे जगतील नाही तर विकल्याशिवाय पर्याय नाही, मांडवा येथील शेतकरी संतोष मुटकुळे म्हणाले.

Web Title: 156 proposals for camping; But not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.