बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:37 AM2018-07-17T00:37:48+5:302018-07-17T00:38:21+5:30

1.5 million liters milk collection jam in Beed district | बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प

बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प

Next

बीड : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दूध पुरवठा बंद आंदोलनाला शेतकºयांनी प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात जवळपास दीड लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले. सहकारी दूध संघांकडे केवळ २८० लिटर दुधाचे संकलन झाले. तर शासनाचे दूध संकलन विनाअडथळा रोजच्याप्रमाणे १६ हजार ५०० लिटर इतके झाले. रस्त्यावर दूध टाकू नये असे आवाहन संघटनेने केल्यानंतरही आष्टी तालुक्यातील शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाविरुध्द रोष व्यक्त केला. शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरु आहे. जिल्ह्यातील केंद्रांनी दूध संकलन करु नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले.

आष्टीत रस्त्यावर दूध ओतले
आष्टी सोमवारी तालुक्यातील आष्टी, ब्रम्हगाव, दोलावङगाव, चिंचाळा, वाळूज, पांढरी येथे शेतकºयांनी स्वत:हून आपले दूधाने भरलेले कॅँड रस्त्यावर ओतले. शासन प्रतिलिटर पाच रुपये दूध दर वाढ करणार नाही तो पर्यत आपले हे दूध दर वाढीचे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे शेतकरी बन्टी भोगाडे म्हणाले.
अंबाजोगाईत शासकीय संकलन
तालुक्यात मागील तीन वर्षांपासून खाजगी, सहकारी संघाकडे दूध संकलन होत नाही. केवळ शासकीय दूध डेअरीत संकलन होते.

परळीत आंदोलन झालेच नाही
परळी येथील मोंढा मार्केटमध्ये तालुका दूधसंघातर्फे नेहमीप्रमाणे शासकीय दराने दूध खरेदी झाली. ३१०० लिटरचे दूध संकलन झाले. परळीत दूध आंदोलन झालेच नाही. तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये आंदोलनाचा प्रभाव दिसला नाही.

गेवराईत १०० टक्के दुध संकलन बंद
गेवराई तालुक्यातील शेतकºयांनी दुध न घातले नाही. त्यामुळे संघाकडे रोज होणारे एक हजार लिटर दूध संकलन झाले नसल्याची माहिती चिंतामणी दुध पुरवठा व उत्पादक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक बापुराव कुलकर्णी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच गेवराई तालुकाध्यक्ष राजेन्द्र डाके, मच्छिंद्र गावडे, रोहिदास चव्हाण, गणेश जंगले भारत सुखदेव, शिवाजी डाके दशरथ मोरे किरण बेदरे व संतोष मोरे यांनी आंदोलनाबाबत गावोगावी जाऊन जागृती केली.

सहकारी संघात २८० लिटर दुधाचे संकलन
शासकीय, विविध सहकारी संघामार्फत व खाजगी डेअरींच्यामार्फत जिल्ह्यात जवळपास २ लाख हजार लिटर दुधाचे संकलन होते. जिल्हा दूध संघात २२ हजार लिटर दुधाचे संकलन झाले नाही. बीड तालुका संघाकडे दररोज होणा-या ४२ हजार लिटरपैकी केवळ ८० लिटर दूध संकलन झाले. आष्टी तालुक्यात ५२ हजारापैकी केवळ २०० लिटर संकलन झाले. गेवराई तालुका दूध संघात १ हजार लिटर दूध संकलन आंदोलनामुळे झाले नाही.

खाजगी प्रकल्पांचे संकलन बंद
बीड जिल्ह्यात तालुका दूध संघाशिवाय खाजगी प्रकल्पातूनही दूध संकलन होते. आष्टी तालुक्यात हा आकडा ३५ हजार लिटर तर शिरुर तालुक्यात जवळपास ९ हजार लिटर, पाटोदा तालुक्यात ९ हजार लिटर तसेच सह्याद्रीचे ८ ते ९ हजार असे जवळपास ५० हजार लिटर दूध संकलन होते. सोमवारी हे संकलन होऊ शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हाती उरते फक्त शेण
साधारण एका गायीवर हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य असा दिवसाकाठी १४० रुपये खर्च येतो. गायीने दहा लिटर दूध दिलेतरी १७ रुपयेप्रमाणे १७० होतात. याशिवाय पशुवैद्यकीय उपचार, पाणी, सांभाळ, मजुरी असा इतर खर्च होतो. त्यामुळे दुधाचे दर शेतकºयांना परवडत नाहीत, हाती फक्त शेणच उरते असे विश्लेषण जाणकाराने केले.

दूध पिशव्यांचे मुलांना वाटप; टँकरची हवा सोडली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काही दिवसांपासून या आंदोलनाची तयारी केली होती. सोमवारी कार्यकर्त्यांनी बीडपासून जवळच पाली येथे सकाळी एका खाजगी डेअरीचे दूध घेऊन जाणारे वाहन अडवून त्यातील दूध पिशव्यांचे पाली येथील इन्फंट प्रकल्पात तसेच अंगणवाडीतील मुलांना वाटप करण्यात आले. आंध्रप्रदेशकडे जाणारा दुधाचा टँकर अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायरमधील हवा सोडून दिली. त्यामुळे टॅँकर रस्त्यावरच उभे होते.

Web Title: 1.5 million liters milk collection jam in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.