बीड जिल्ह्यात पाणवठ्यावर १२ हजार ७७४ वन्यप्राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 AM2019-05-21T00:24:34+5:302019-05-21T00:25:08+5:30

बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ प्राणी असल्याचे निष्पन्न झाले.

12 thousand 774 wildlife sanctuaries in Beed district | बीड जिल्ह्यात पाणवठ्यावर १२ हजार ७७४ वन्यप्राणी

बीड जिल्ह्यात पाणवठ्यावर १२ हजार ७७४ वन्यप्राणी

googlenewsNext
ठळक मुद्देकडकडीत दुष्काळातही वन्यजीवांची आकडेवारी समाधानकारक

विजयकुमार गाडेकर।
शिरूर कासार : बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ प्राणी असल्याचे निष्पन्न झाले.
वनपरिक्षेत्रात सध्या दुष्काळाचा प्रादुर्भाव वाढलेला असून, चारा पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरी वनविभाग व प्राणीमित्र संघटनेच्या सहकार्याने आवश्यक त्या ठिकाणी पाणवठे व त्यात पाणी टाकल्याने वन्यप्राण्याला दुष्काळाची झळ तेवढीशी जाणवली नसल्याचे आकडेवारीवरून समजून येते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रामुख्याने प्रत्येक वर्षी हा उपक्र म राबवला जातो. त्यातून जिल्यातील वन्यप्राण्यांची आकडेवारी जाणून घेतली जाते. त्यानुसार आवश्यक त्या गरजा पूर्ण करणे सोपे होते. शनिवारी वनविभाग व वन्यजीव पुनर्वसन व संवर्धन या सिद्धार्थ सोनावणे यांच्या संस्थेबरोबरच अन्य प्राणीमित्रांनी या प्रगणन कामात सहभाग घेतला होता. विविध ठिकाणच्या पाणस्थळावरील आकडेवारीचे संकलन केले असता विविध जातीचे वन्यप्राणी तब्बल १२ हजार ७७४ आढळून आले. या वन्यजीवांची तहानभूक भागविण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाल्यास यात आणखी वाढ होऊ शकते.
मोर निम्मे, लांडोर दुप्पट
नायगांव अभयारण्यात निरगुडी, पिंपळगाव (धस),डोंगरिकन्ही या नियत क्षेत्रात पाणस्थळावर १० हजार १२१ वन्यप्राणी आढळून आले. त्यात मोर (नर) २ हजार २५२, तर लांडोर (मादीचा आकडा) ५ हजार ९५१ एवढा तयार झाला.
त्याशिवाय कोल्हा, ससा, ऊद, खोकड, रानडुक्कर, मूंगूस, सायाळ, लांडगा, चिंकारा, तरस, रानमांजर, काळवीट व नीलगाय असा एकूण आकडा १० हजार १२१ इतका झाला.
नायगांव अभयारण्य परिक्षेत्राच्या बाहेर देखील असणाºया पाणस्थळावर कॅमेºयाच्या माध्यमातून ही प्रगणना करण्यात आली.
यात २ हजार ६५३ इतके वन्यप्राणी आढळून आले. नायगांव अभयारण्य परिक्षेत्राबाहेर देखील मोरांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.
७३ पाणवठे, २६ ट्रॅप कॅमेरे
विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास गीते, अशोक काकडे, रंगनाथ शिंदे वनअधिकारी सायमा पठाण यांच्या सह वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, सर्पराज्ञी संचालिका सृष्टी सोनवणे, रविना सवाई, वैशाली गायकवाड, विनय इंगळे, वनपाल अजय देवगुडे, दिगंबर फुंदे, विजय केदार, राजू नांदुरे, एस. पी. शेळके, शोभा आघाव, शिवाजी आघाव, गोकुळ आघाव, अनिल आघाव आदी वनपाल, वनरक्षक, वनमजुरांनी या प्रगणना कार्यात सहभाग घेतला.
वन परिक्षेत्राबाहेरही वन्यजीवांचा वावर
परिक्षेत्रा बाहेर ८८१ मोर, पाठोपाठ ७४१ रानडुकर, काळवीट ४२३, चिंकारा २५२, सायाळ ६६ , कोल्हे ६३, खोकड २८, ससे ९२, मुंगुस १५, लांडगे २५, नीलगाय ३२, खार २४ तर रानमांजर, तडस, घोरपड प्रत्येकी २ मिळून आले. जिल्हाभरात सर्प गरुडाचा आकडा अवघ्या पाचवर स्थिरावला.

Web Title: 12 thousand 774 wildlife sanctuaries in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.