-Ravindra More
महिला कोणत्याही देशाची असो, ती सुंदर आणि आदरयुक्तच मानली जाते. मात्र नुकताच करण्यात आलेल्या सर्वेनुसार काही देशाच्या महिलांना सर्वात सुंदर मानण्यात आले आहे. त्यांना देण्यात आलेल्या मानांकनानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मग जाणून घेऊया की, कोणत्या देशाच्या महिला सर्वाधिक सुंदर आहेत ते. * व्हेनेझुएला
या यादीत व्हेनेझुएला नंबर एक वर येतो. येथील मुली खूपच सुंदर असतात. या देशाने ब्युटी कॉन्टेस्टचे २१ मानांकन जिंकले आहेत. त्यात ७ मिस यूनिवर्स, ६ मिस वर्ल्ड, ७ मिस इंटरनेशनल, २ मिस अर्थ एवढे मानांकन या देशातील मुलींनी पटकावले आहेत. * अमेरिका  
या यादीत दुसरे नाव आहे अमेरिकेचे. या देशाने १४ ब्युटी मानांकन आपल्या नावे केले आहेत. त्यात ८ मिस यूनिवर्स, ३ मिस वर्ल्ड, ३ मिस इंटरनेशनल क्राउन जिंकले आहेत. * फिलिपिन्स
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फिलीपींसच्या मुलींनी आतापर्यंत १२ ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले आहेत. त्यात ३ मिस यूनिवर्स, १ मिस वर्ल्ड, ५ मिस इंटरनेशनल, ३ मिस अर्थ असे मानांकन या देशातील मुलींनी पटकावले आहेत. * भारत 
या यादीत भारत चौथ्या क्रमाकावर आहे. भारताच्या नावे ८ मानांकन आहेत. भारतीय मुलींनी आतापर्यंत २ मिस यूनिवर्स, ५ मिस वर्ल्ड, १ मिस अर्थ एवढे मानांकन मिळविले आहेत. * इंग्लंड 
इंग्लंडच्या नावे ८ नामांकन आहेत. येथील मुलीदेखील खूपच सुंदर आहेत. या देशाने ५ मिस वर्ल्ड आणि ३ मिस इंटरनेशनल असे मानांकन आहेत. या यादीत इंग्लंडचे स्थान पाचव्या स्थानावर आहे. * आॅस्ट्रेलिया 
सहाव्या क्रमांकावर असलल्या आॅस्ट्रेलिया देशाजवळ ७ नामांकन आहेत. सोबतच २१ रनर्सअप आहेत. येथील मुलींनी २ मिस यूनिवर्स, २ मिस वर्ल्ड आणि ३ मिस इंटरनेशनल असे नामांकन मिळविले आहेत. * ब्राझील 
ब्राझील जवळ ६ नामांकन आहेत. शिवाय ३५ रनर्सअप मध्येही या देशाच्या मुली आहेत. यात २ मिस यूनिवर्स, १ मिस इंटरनेशनल, २ मिस वर्ल्ड, आणि २ मिस अर्थ असे मानांकन जिंकले आहेत. 
  


* जर्मनी 
जर्मनी जवळ ५ क्राउन आणि १४ रनर्सअप मानांकन आहेत. त्यात २ मिस वर्ल्ड, १ मिस यूनिवर्स, आणि २ इंटरनेशनल अशांचा समावेश आहे. 
 

   
Web Title: WOW! 'These' women are the most beautiful in the world!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.