Video: These are home remedies to delete the Dark Circle! | Video : डार्क सर्कल हटविण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय !

-रवींद्र मोरे 
डोळ्याखाली डार्क सर्कलची समस्या बहुतांश लोकांना प्रभावित करते. विशेष म्हणजे या समस्येने महिला आणि पुरुष दोघेही त्रस्त होऊ शकतात. डोळ्याच्या भोवतालची त्वचा बरीच नाजूक असते आणि चेहऱ्याच्या इतर भागाच्या तुलनेने पातळदेखील असते, यामुळे या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डार्क सर्कलमुळे साहजिकच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खालावते. म्हणून प्रत्येक  सेलिब्रिटी डार्क सर्कल होऊ नयेत म्हणून काही घरगुती उपाय करतात. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या घरगुती उपायांनी ही समस्या दूर करु शकतात. 

* ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते  
डार्क सर्कल कमी वयातही होऊ शकतात. विशेषतः अनुवांशिकता आणि थकवा यामुळे ही समस्या उद्भवते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पोषणयुक्त आणि संतुलित आहार घेणे होय. त्यात ताजे फळ, दही आणि अंकुरित कडधान्ये, स्किम्ड मिल्क, घरगुती पनीर, दाळ आदींचा समावेश असावा.  

* नियमित व्यायाम  
नियमित व्यायाम आणि दिर्घ श्वासाने रक्ताभिसरण प्रक्रिया उत्कृष्ट राहते, शिवाय आॅक्सिजनचा पुरवठा मुबलक होईल आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल.  

* पुरेशी झोप  
रात्री कमीत कमी ७ तास झोपणे आणि दरदिवशी किमान २० मिनीटापर्यंत ध्यानधारणा करणे किंवा सौम्य आणि मधुर संगीत ऐकणे आदी उपायदेखील ही समस्या दूर होण्यास मदत करतात.  

* अंडर आय क्रीम  
डार्क सर्कलच्या ठिकाणी बदामयुक्त अंडर आय क्रीम लावावी. यामुळे आपल्या त्वचेला पोषण तर मिळेलच शिवाय तेथील रंगदेखील उजाळेल.  

* काकळीचा रस 
या ठिकाणी नियमित काकळीचा रस लावावा. १५ मिनिटानंतर साध्या पाण्याने धुवावे. काकळीतील पोषक तत्त्वांमुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.  

* बटाटा आणि काकळीचा प्रयोग 
डार्क सर्कल बरोबर डोळ्यांच्या भोवताली सूजदेखील असेल तर समप्रमाणात बटाटा आणि काकळीचा रस लावावे.  
 
* काकळी आणि लिंबू 
याठिकाणी काकळी आणि लिंबूचा रस समप्रमाणात घेऊन एकत्र करावे आणि नियमित लावावे. १५ मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.   

* ग्रीन टी-बॅग
ग्रीन टी-बॅगमध्ये अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट असल्याने डोळ्यांच्या खाली लावल्याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. 

* संत्रीचा रस 
संत्रीचा रस आणि ग्लिसरीनच्या मिश्रणाला २० मिनिटापर्यंत आठवड्यातून तीन वेळेस लावावे. यामुळेही डार्क सर्कल दूर होतात.  Also Read : ​डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या
Web Title: Video: These are home remedies to delete the Dark Circle!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.