Unnecessary hair obstruction to beauty! | अनावश्यक केसांमुळे सौंदर्याला बाधा!

-Ravindra More
 
प्रत्येक मुलीला वाटते की, आपण सुंदर दिसावे. मात्र बºयाच मुलींच्या अंगावर असलेले अनावश्यक केस त्यांच्या सौंदर्याला बाधा ठरतात. अनेक उपाय करुनही मुलींच्या पदरात बºयाचदा अपयशच पडते. काही घरगुती उपायांनी अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळू शकते. मग काय आहेत या घरगुती उपाययोजना याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया...
 
मुली जेव्हा तारुण्यावस्थेत येतात, तेव्हा त्यांच्या शरीरात हॉर्मोनल बदल घडत असतो. या बदलामुळे रक्तातील पुरुषी हार्माेन्सचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनावश्क केसांची वाढ होेते. साधारणत: १८ ते ४५ वयोगटात हाता-पायावर, चेहºयावर, छातीवर तसेच मानेवर हे केस येतात. तसेच जनुकेदेखील शरीरावर अनावश्यक केस वाढीचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. तारुण्यामध्ये मासिक पाळी व इतर शारीरिक बदलांमुळे काही हार्मोन्स तयार होतात. या हार्मोन्सचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असेल तर केसांची वाढ जास्त  होते.
 
काय आहेत घरगुती उपाय?
* पुदिन्याचा चहा-
पुदिन्याचा चहा नैसर्गिक असून, हा चहा घेतल्यानंतर स्त्रियांच्या रक्तात असणाºया जास्तीच्या पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण कमी होते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कपात काही पुदिन्याची पाने ठेऊन त्यात उकळते गरम पाणी टाका व दहा मिनिटे तसेच राहू द्या. असा चहा पाच दिवस रोज दोनदा प्या.  
 
* हळद व बेसन 
दह्यामध्ये हळद आणि बेसन एकत्र करुन केलेला पॅक हा शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यास मदत करतो. एक चमचाभर बेसनात चिमूटभर हळद टाकून त्यात एक चमचा दही टाका व हे मिश्रण एकत्र करा. तयार झालेला पॅक चेहरा व मानेला लावा व हलकासा मसाज करा. पॅक सुकल्यानंतर थोड्या वेळाने धुऊन टाका. 
 
* पॉमिस दगडाचा वापर 
शरीरावर हा दगड घासल्याने अनावश्यक केस मुळापासून निघण्यास मदत होते. यासाठी केस असलेल्या भागावर गरम पाणी टाका. त्यानंतर दगडाला गोलाकार दिशेने घासा. असे केल्याने केस हळूहळू निघून जातील. तसेच पाण्याने तो भाग स्वच्छ करुन त्यावर मॉयश्चरायजर क्रीम लावा. 
 
* लिंबू व साखरेचा पॅक 
लिंबात सौम्य ब्लिचिंग गुणधर्म असल्याने केसांची वाढ रोखण्यास मदत होते. लिंबू व साखरेचा पॅक अनावश्यक केस काढण्यास उपयुक्त ठरतो.  ३० ग्रॅम साखर ,१० मिली ताजा लिंबाचा रस व १५० मिली पाणी एकत्र करुन बनलेला पॅक केस वाढण्याच्या दिशेने लावा. सुमारे १५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुताना हलकासा मसाज करा. हा पॅक आठवड्यातून एकदा लावा.
 
* लिंबू व मधाचा पॅक 
शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी लिंबू आणि मधाचा पॅकदेखील उपयुक्त ठरतो. यासाठी ४० मिली मध आणि १० मिली लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने केस वाढीच्या ठिकाणी लावा व सुमारे १५ मिनिटानंतर धुवा. मधातील गुणधमार्मुळे त्वचेला उजाळा तर मिळतोच शिवाय हा पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने नैसर्गिकरीत्या अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळेल.

Web Title: Unnecessary hair obstruction to beauty!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.