पिम्पल्सचे डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि मधाचा असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:39 PM2018-09-18T12:39:19+5:302018-09-18T12:41:52+5:30

चेहऱ्यावर पिम्पल आलेत आणि काही उपाय केल्यावर दूर झाले तर बरं वाटतं. पण जाता जाता हे पिम्पला चेहऱ्यावर डाग देऊन गेले तर मग समस्या वाढते.

Turmeric, cinnamon, lemon, honey paste for the treatment of acne spots | पिम्पल्सचे डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि मधाचा असा करा वापर!

पिम्पल्सचे डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि मधाचा असा करा वापर!

googlenewsNext

चेहऱ्यावर पिम्पल आलेत आणि काही उपाय केल्यावर दूर झाले तर बरं वाटतं. पण जाता जाता हे पिम्पला चेहऱ्यावर डाग देऊन गेले तर मग समस्या वाढते. कारण पिम्पल पेक्षाही जास्त त्रासदायक असतात हे डाग, जे सहजपणे जात नाहीत. पण हे पिम्पलचे डाग कमी करायचे असेल तर यासाठी काही घरगुती उपाय वापरु शकता. एक आठवडा रोज हा उपाय केला तर चेहऱ्यावरील डाग कमी होतील. 

आवश्यक सामग्री :

- एक बाऊल

- हळद पावडर

- बारीक केलेली दालचिनी

- लिंबाचा रस

- मध

पेस्ट कशी तयार कराल?

सर्वातआधी बाऊलमध्ये एक चमचा हळद टाका. त्यात तितक्याच प्रमाणात बारीक केलेली दालचिनी टाका. त्यावरुन अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध टाका. आता या चारही गोष्टी चांगल्याप्रकारे मिश्रित करा. जर ही पेस्ट फार घट्ट झाली तर त्यात थोडं पाणी टाका. ही पेस्ट फार जास्त घट्टही असू नये आणि पातळही असू नये. 

कसे लावाल?

बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने ही पेस्ट चेहऱ्यावरील डागांवर लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. लागोपाठ एक आठवडा हा उपाय केल्यास डागांचा रंग कमी होतील. 

(टिप : हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काहींच्या त्वचेला यातील काही गोष्टींची अॅलर्जी असू शकते.)
 

Web Title: Turmeric, cinnamon, lemon, honey paste for the treatment of acne spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.