मान्सूनमध्ये पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 04:54 PM2019-07-21T16:54:39+5:302019-07-21T16:56:52+5:30

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणात सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते पण वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांसोबतच त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Tips to keep away acne in monsoon or potato or sugar pack to fight acne in monsoon | मान्सूनमध्ये पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

मान्सूनमध्ये पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

(Image Credit : Hennig Arzneimittel)

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणात सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते पण वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांसोबतच त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच चेहऱ्यावर पिंपल्स आणि पूरळ येतात आणि जाता-जाता डाग ठेवून जातात. त्यामुळे मान्सूनमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणं फायदेशीर ठरतं. तसं तर अ‍ॅक्ने आणि पिंपल्स कोणत्याही वातावरणात येऊ शकतात. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही या सर्व समस्या दूर करू शकता. 

1. सर्वात आधी जंक फूड खाणं टाळा. तसेच जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्याने त्वचा तेलकट होते. परिणामी पिपल्सची समस्या वाढते. 

2. दररोज कमीत कमी 3 लीटर पाणी प्या. याशिवाय कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्यानेही त्वचेला फायदा होतो. पाण्याव्यतिरिक्त सलाड, फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्य आणि दही मुबलक प्रमाणात खा. 

(Image Credit : Today Show)

3. जर त्वचा ऑयली असेल तर सर्वात आधी स्किन क्लीनिंग करा आणि त्यानंतर एस्ट्रिंजेंट ऑइल लावा. एस्ट्रिंजेंट त्वचेवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. 

4. वाफ घेतल्याने पिंपल्स दूर होतात. वाफेमुळे त्वचेची डिप पोर्स ओपन होतात आणि त्यांच्यातील घाण आणि विषारी तत्व निघून जातात. यामुळे पिंपल्स दूर होण्यासोबतच त्वचाही निरोगी होते. 

5. कमीत कमी मेकअप करा, कारण मेकअप प्रोडक्ट्स त्वचेचे ओपन पोर्स बंद करतात आणि यामुळे अॅक्ने आणि ब्रेकआउट होऊ शकतात. जर तुम्ही मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थित स्वच्छ करून झोपा. 

6. पावसाळ्यामध्ये पिपंल्स दूर करण्यासाठी साखरही अत्यंत उपयोगी ठरते. यासाठी एक चमचा साखरेमध्ये अर्धा चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी लावा. तुम्ही हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावरही लावू शकता. अर्धा तास ठेवून साधारणतः स्वच्छ पाण्याने धुवून टाका. अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून टाका. लक्षात ठेवा की, हे मिश्रण लावल्यानंतर चेहऱ्यावर साबण किंवा इतर कोणत्याही पदार्थांचा वापर करू नका. 

7. बटाटाही पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी तुम्ही बटाट्याचे तुकडे करून पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी लावू शकता. तसेच बटाट्याचा रसही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे पिंपल्स दूर होण्यासोबतच त्वचेवरील डागही दूर होतात.
 
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Tips to keep away acne in monsoon or potato or sugar pack to fight acne in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.