डोळ्यांनुसार खरेदी करा मस्करा; 'या' 6 गोष्टी करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:22 PM2019-04-08T14:22:16+5:302019-04-08T14:26:51+5:30

आपण अनेकदा ऐकतो की, मेकअप करणं ही देखील कला आहे. ज्यामध्ये तुमच्या त्वचेच्या कमतरता लपून तुमचं सौंदर्य सर्वांसमोर येतं. परंतु परफेक्ट मेकअप तेव्हाच करता येतो जेव्हा तुम्ही योग्य मेकअप टूल्स खरेदी करता.

Things to keep in mind while buying mascara as per your eyes | डोळ्यांनुसार खरेदी करा मस्करा; 'या' 6 गोष्टी करतील मदत

डोळ्यांनुसार खरेदी करा मस्करा; 'या' 6 गोष्टी करतील मदत

googlenewsNext

आपण अनेकदा ऐकतो की, मेकअप करणं ही देखील कला आहे. ज्यामध्ये तुमच्या त्वचेच्या कमतरता लपून तुमचं सौंदर्य सर्वांसमोर येतं. परंतु परफेक्ट मेकअप तेव्हाच करता येतो जेव्हा तुम्ही योग्य मेकअप टूल्स खरेदी करता. मग ती लिपस्टिक असो किंवा मस्करा. तुम्ही या प्रोडक्ट्सचा वापर करत असाल तर तो योग्य आहे की, नाही. कोणत्या प्रकारचा मस्करा आपल्यासाठी योग्य आहे आणि मस्करा घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आश्यक असतं, हे जाणून घेऊया...

(Image Credit : beautynesia.id)

बेसिक मेकअपबाबत सांगायचे झाले तर मुली काजळ लावण्याऐवजी लिपस्टिक, आयशॅडो आणि मस्कराचा वापर करतात. मस्करा पापण्यांना शेप देण्यासोबतच त्या सुंदर दिसण्यासाठीही मदत करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? मस्करा खरेदी करतानाही अनेक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत...

1. सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्या की, मस्करामध्ये दोन प्रकारच्या ब्रशचा वापर करण्यात येतो. एक ब्रश तो असतो जो पापण्यांना दाट लूक देण्यासाठी मदत करतो. तसेच दुसरा ब्रश एचडी लॅशेज वाला असतो. 

2. मेकअप पसरू नये किंवा काजळ पसरू नये म्हणून मुली वॉटरप्रूफ मस्करा खरेदी करतात. परंतु लक्षात ठेवा की, जर तुम्ही दररोज मस्करा वापरत असाल तर तो वॉटरप्रूफ असू नये.


 (Image Credit : Kenali.co)

3. मस्करा खरेदी करताना व्यवस्थित बघून घ्या. त्याचा शेप परफेक्ट असल्याची खात्री करून घ्या तसेच तो कोरडा तर नाही ना याचीही काळजी घ्या. 

4 . जर तुमचे डोळे छोटे असतील तर ब्लॅक कलरचा मस्करा खरेदी करा. त्यावर ब्लू शेडचा मस्करा सुंदर दिसेल आणि डोळेही मोठे दिसतात. 

5. तुमच्या स्किन टोननुसार मस्करा खरेदी करा. जर स्किन टोन डार्क असेल तर ब्लॅक मस्करा खरेदी करा आणि जर त्वचा गोरी असेल तर ब्लॅकऐवजी डार्क ब्राउन कलरचा मस्करा उत्तम ठरतो. 

6. मस्करा ब्रश जास्त रूंद असू नये आणि जास्त पातळही असू नये. जेणेकरून तो रोल करणं सोपं होइल. 

टिप : वरील सर्व टिप्स आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे परफेक्ट लूक मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Things to keep in mind while buying mascara as per your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.