(Image Credit : www.livescience.com)

पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. याने तुमच्या व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच तुमच्या सौंदर्यातही भर पडते. मात्र दातांवरील पिवळेपणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या होतात. आपण कुणालाही भेटतो तेव्हा सर्वात महत्त्वाची ठरते ती आपली स्माइल. पण दात जर पिवळे असतील तर तुमचं इम्प्रेशन कमी होतं. दातांवर पिवळेपणा येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील. 

दात पिवळे होण्याची कारणे

दातांवर पिवळेपणा येण्याचं एक मुख्य कारण आनुवांशिकता हे देखील आहे. तसेच तुम्ही जे पाणी पिता त्यात जर फ्लोराइडचं प्रमाण जास्त असेल तर यानेही दातांवर पिवळेपणा येतो. काही लोकांच्या दातांवर डाग हे चहा आणि कॉफीमुळे येतात. कारण यात कॅफीन जास्त असतं. आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे दात पिवळे होतात. 

सायट्रिक/अ‍ॅसिडीक फ्रूट्स

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ सतत सेवन केल्याने दातांवर पिवळेपणा येतो. ही फळे आंबट असतात. म्हणजे सायट्रिक फ्रूट्समध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे दातांवरील आवरण नष्ट होतं. त्यामुळे दातांवर पिवळेपणा येतो. 

मिठाई

जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण याने दातांचं फार नुकसान होतं. मिठाई आणि डेजर्ट्समध्ये असलेल्या शुगरमुळे दातांमध्ये किड तर लागतेच सोबतच दातांचं आवरणही नष्ट होतं. त्यामुळे तुमचे दात पांढरे आणि चमकदार राहत नाही. 

रात्री ब्रश न करणे

जर तुम्ही रात्री ब्रश करत नसाल तर तुमचे दात हळूहळू पिवळे होऊ लागतात. दातांची चमक नाहीशी होते. सोबत तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि किड लागण्याची समस्या होते. तसेच तुम्ही दात केवळ २ मिनिटेच ब्रश करत असाल तर तुमचे दात व्यवस्थित स्वच्छही होत नाहीत. 


Web Title: These are the reasons behind stained and yellowish teeth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.