Take care of the skin! | आॅईली स्कीनची अशी घ्या काळजी!

त्वचेच्या प्रकारावरुन त्वचेच्या समस्या निर्माण होतात. बहुतांश जणांची त्वचा तेलकट असल्याने चेहºयावर पिंपल्स, काळे डाग आदी समस्या उद्भवतात. सहसा आपण या समस्यांवर वरच्यावर उपाय करतो, मात्र या समस्या पुन्हा होऊ नयेत म्हणून मुळात तेलकट त्वचेवर उपाय करायला हवा. जाणून घेऊया आॅईली स्कीनची काळजी कशी घ्यावी.
 
* तेलकट त्वचा असल्यास क्लिन्झिंग अवश्य करावे. त्यामुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीसे होऊन रंध्रे मोकळी होतात. या उपायाने ब्लॅकहेड्सचीही समस्या दूर होते. आठवड्यातून एकदा लाईट स्क्रब केल्याने फायदा होतो.

* तेलकट त्वचा ज्यांची असेल त्यांनी ग्लिसरिनयुक्त साबण अजिबात वापरु नये. आॅईल फ्री फेसवॉशचा वापर करु शकतो. याने त्वचा आॅईल फ्री राहते. 

* आॅईली स्कीनसाठी तांदुळ, पुदीना आणि गुलाबजल यांचा नैसर्गिक फेसपॅकही उपयुक्त आहे.त्यासाठी तांदळाच्या पिठीमध्ये पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेह-यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा.दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून पॅक काढून टाकावा.

* पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टॉनिक ठेवा. त्याबरोबर वेट टिश्युजही हवेत. दर दोन तासांनी यानं चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते.

* आॅईली स्किनवर अँकनीचा त्रास होत असेल तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल मॉईश्चरायझर वापरणं चांगलं.

* या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी आहाराचे पथ्यही महत्त्वाचे आहे.त्वचेचं सीबम आॅईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वर्ज्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे. 
Web Title: Take care of the skin!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.