उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:46 PM2019-04-27T12:46:00+5:302019-04-27T12:49:09+5:30

वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Summer tips common skin problems in summers causes treatment prevention and home remedies | उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

उन्हाळ्यात हमखास होणाऱ्या 3 समस्या; उशीर होण्याआधी करा 'हे' उपाय!

Next

वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वेळीच जर यावर उपाय केले नाही तर त्याचे त्वचेवर विपरित परिणाम घडून येतात. सध्या उन्हाळा सुरू असून, यादरम्यान अनेकांना स्किनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रखर उन्हामुळे या समस्यांमध्ये वाढचं होत राहते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये 3 सर्वात कॉमन स्किन प्रोब्लेम्सबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊयात या समस्यांची कारणं आणि या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांबाबत...

1. सन टॅनिंग 

उन्हाळा म्हणजे सूर्याचं प्रखर ऊन आणि त्यामुळे होणाऱ्या सन टॅनिंग. हे जुळलेलं समीकरणचं अस म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यापासून सुटका करणं सहज शक्य होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरिही त्वचेवर उन्हाचा परिणाम होतोच. या सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन आपली मदत करते. जी आपल्या त्वचेवर एका कव्हरप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करते. परंतु जर एकदा सन टॅनिंग झालं तरिही तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्यानंतर कोणतंही सनस्क्रिन लावल्याने काहीही फायदा होत नाही. टॅनिंगमुळे त्वचा काळवंडते. अनेकदा टॅनिंगमुळे त्वचेवर स्किन रिअ‍ॅक्शन्सही दिसून येतात. 

सन टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स दररोज वापरणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हाही उन्हामध्ये बाहेर निघणार असाल, त्यावेळी त्वचेला एखाद्या स्कार्फने कव्हर करा. त्वचेसोबतच डोळेही सनग्लासेसचा वापर करून कव्हर करा. कारण उन्हामुळे त्वचेसोबतच डोळ्यांनाही नुकसान पोहोचतं. जर उन्हातून आल्यानंतर टॅनिंगच्या समस्येची भिती असेल तर घरी आल्यानंतर त्वचेवर कोरफडीचा गर लावा. काही वेळासाठी ठेवा आणि पाण्याने धुवून टाका. 

2. ऑयली त्वचा 

उन्हाळ्यामध्ये अनेकांची त्वचा ऑयली होत असून हे ऑइल त्वचेच्या रोमछिद्रांमधून बाहेर येतं. अनेकदा हे ऑयल बाहेरच्या धुळ-मातीमुळे चेहऱ्यावरील स्किन पोर्स ब्लॉकही होतात. ज्यामुळे पिंपल्सची समस्या निर्माण होते. जर या पिंपल्सवर वेळीच उपचार करण्यात आले नाही. तर त्यामुळे चेहऱ्यावर डाग राहतात. ज्या मुली उन्हाळ्यामध्ये दररोज मेकअप करतात. त्यांनाही या तेलकट त्वचेमुळे पोर्स बंद होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. 

ऑयली त्वचेच्या समस्येवर उपचार म्हणून काही घरगुती उपाय बेस्ट ठरतात. त्यासाठी दररोज टोमॅटोच्या प्युरीमध्ये थोडासा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर थोड्यावेळासाठी तशीच ठेवा. 15 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करून पेस्ट काढून टाका. ही पेस्ट ब्लॉक पोर्स ओपन करण्यासाठी मदत करते. तसेच यामुळए त्वचेचा रंगही उजळतो. 

उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून दोन वेळा फेस पॅकचाही वापर करू शकता. त्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये थोडं लिंबू आणि थोडीशी हळद एकत्र करा. फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक आठवड्यातून कमीत कमी 2 किंवा 3 वेळा वापरा. यामुळे पोर्स ओपन होतील, रंग उजळेल आणि टॅनिंगही दूर होइल. 

3. हेयर प्रॉब्लेम्स 

उन्हाळ्यामध्ये त्वचेशिवाय केसांवरही परिणाम होतो. केसांमध्ये स्थॅतिक इफेक्ट येतात, ज्यामुळे केस कोरडे होतात आणि गळण्याचंही प्रमाण वाढतं. स्प्लिट एंड्सची समस्याही उन्हाळ्यातचं होते. जर उन्हाळ्यामध्ये तुमचे केस कोरडे किंवा ऑयली होतात. कारण स्काल्पच्या त्वचेवर जास्त ऑइल तयार होतं. त्यामुळे केस सतत धुण्याची गरज भासते. 

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये दररोज हेयर वॉश करू नये. दररोज केस धुणंही टाळावं. तसेच केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेयर वॉश करा.  हेयर वॉशनंतर कंडशनरचा वापर करणंही गरजेचं असतं. शॅम्पू केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी आणि केसांना सॉफ्ट आणि सिल्की लूक देण्यासाठी मदत होते. 

शॅम्पू, कंडिशनरव्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये केस हेल्दी करण्यासाठी घरगुती उपाय करा. एका कपामध्ये अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी एकत्र करा. शॅम्पू केल्यानंतर तयार मिश्रण केसांना लावा. जास्त वेळ केसांना ठेवू नका. अ‍ॅपल साइडर व्हिनेगर केस आणि स्काल्पमधअये होणारं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer tips common skin problems in summers causes treatment prevention and home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.