उन्हाळ्यामध्ये ग्लोइंग आणि फ्रेश स्किनसाठी 'या' टिप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:52 PM2019-04-25T14:52:56+5:302019-04-25T15:03:32+5:30

उन्हाळ्यामध्ये त्वचेची एस्क्ट्रा काळजी घेण्याची गरज असते. खरं तर उन्हाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येत असतो. उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो.

Summer special skin care tips for fresh and glowing skin | उन्हाळ्यामध्ये ग्लोइंग आणि फ्रेश स्किनसाठी 'या' टिप्स फॉलो करा

उन्हाळ्यामध्ये ग्लोइंग आणि फ्रेश स्किनसाठी 'या' टिप्स फॉलो करा

Next

उन्हाळ्यामध्ये त्वचेची एस्क्ट्रा काळजी घेण्याची गरज असते. खरं तर उन्हाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येत असतो. उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामधील प्रखर ऊन आणि वातावरणातील प्रचंड उकाडा त्वचेला नुकसान पोहोचवतो. अशातच त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते. आज आम्ही तुम्हाला काही खास स्किन केयर टिप्स सांगणार आहोत. ज्यांना फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये चमकदार आणि फ्रेश स्किन मिळवू शकता. 

उन्हाळ्यात त्वचेची घ्या खास काळजी :

1. व्हिटॅमिन-सीयुक्ट पदार्थांचं सेवन करा

त्वचेसाठी व्हिटॅमिन-सी अत्यंत फायदेशीर ठरतं. संत्री, लिंबू, आवळा, द्राक्षं, टॉमेटो इत्यादी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. उन्हाळ्यामध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच त्वचाही हेल्दी राहण्यास मदत होते. 

2. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी 

उन्हाळ्यामध्ये त्वचा मुलायम आणि हायड्रेट ठेवणं अगदी अशक्य काम असतं. उन्हाळ्यामध्ये निदान 2 वेळा तरी हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करणं गरजेचं असतं. हे मास्क त्वचेला हायड्रेट करण्यासोबतच डॅमेज झालेली त्वचा रिपेअर करण्याचंही काम करते. त्याचबरोबर त्यामुळे पिंपल्सपासूनही सुटका होते. 

3. सनस्क्रीन लावा 

उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त गरज सनस्क्रिनची असते. उन्हाळ्यामधील प्रखर सूर्यकिरणांमध्ये घराबाहेर जाण्याआधी हात, मान, पाय आणि चेहऱ्यावर सनस्क्रिन नक्की लावा. 

4. मेकअप कमी करा

उन्हाळ्यामध्ये मेकअपचा वापर कमीत कमी करणं गरजेचं असतं. वातावरणातील गरम हवेमुळे त्वचेची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप करणं गरजेचं असतं. 

5. टोनरचा वापर करा

स्किन हेल्दी ठेवण्यासाठी टोनर गरजेचं असतं. टोनरचा वापर केल्यामुळे ऑयली त्वचेपासून सुटका होते. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. उन्हाळ्यामध्ये काकडी किंवा कोरफडीचं टोनर अत्यंत फायदेशीर ठरतं. 

6. पाणी जास्त प्या

स्किन हेल्दी ठेवण्यासाठी पाणी फार मदत करत. पाणी त्वचेसोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार करण्यास मदत होते. तसेच त्वचा मुलायमही होते. दिवसभरामध्ये कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer special skin care tips for fresh and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.