घामामुळे खराब होणार नाही मेकअप, भर उन्हातही फ्रेश लूकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 01:07 PM2019-04-25T13:07:48+5:302019-04-25T13:14:48+5:30

उन्हाळ्यात वेगवेगळ्या समस्यांसोबतच महिलांना भेडसावणारी सर्वात मोठी सममस्या म्हणजे घामामुळे खराब होणारं मेकअप.

Summer make up tips for long lasting fresh look | घामामुळे खराब होणार नाही मेकअप, भर उन्हातही फ्रेश लूकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

घामामुळे खराब होणार नाही मेकअप, भर उन्हातही फ्रेश लूकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Next

(Image Credit : Reflection of Sanity)

उन्हाळ्यात वेगवेगळ्या समस्यांसोबतच महिलांना भेडसावणारी सर्वात मोठी सममस्या म्हणजे घामामुळे खराब होणारं मेकअप. पण गरमीच्या दिवसातही मेकअप फ्रेस ठेवायचं असेल तर हे एकप्रकारे चॅलेन्जच आहे. कारण या दिवसात मेकअप लवकर उतरतं. काही लोकांच्या त्वचेवर लाल चट्टेही पडतात. पण यामुळे जास्त हैराण होण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सने तुम्ही मेकअप फ्रेश ठेवू शकता. 

(Image Credit : Daily Vanity)

१) मॉइश्चरायजरने मेकअपची सुरुवात करा - वातावरण गरम असो वा थंड त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायजर फार गरजेचं आहे. पण गरमीच्या दिवसात नेहमी ऑइल फ्री मॉइश्चरायजरचाच वापर करा. सोबत ऑइल फ्री फाऊंडेशनही लावा.

(Image Credit : How To Apply Makeup)

२) सनस्क्रीन आवर्जून वापरा - उन्हाच्या झळांमुळे त्वचा डॅमेज होण्यापासून बचाव करायचा असेल तर सनस्क्रीन आवर्जून लावा. सनस्क्रीनचा वापर मेकअपच्या आधीच करा. सामान्यपणे सनस्क्रीन प्रभाव २ ते अडीच तासच राहतो. त्यामुळे उन्हात पडण्याआधी या गोष्टीची काळजी घ्या.

(Image Credit : Makeup.com)

३) प्रायमर आहे गरजेचं - मॉइश्चराइजनंतर चेहऱ्यावर प्रायमर नक्की लावा. प्रायमर लावल्याने मेकअप जास्त वेळेसाठी फ्रेश राहतं. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी दिसतात, सोबतच पोर्सही कव्हर होतात. 

(Image Credit : Saubhaya Makeup)

४) ब्रॉन्जरने चेहऱ्याला द्या ग्लो - गरमीच्या दिवसात फ्रेश दिसण्यासाठी ब्रॉन्जरची महत्त्वाची भूमिका असते. मेकअप आर्टिस्टनुसार, ब्रॉन्जरचा वापर केवळ चेहऱ्याच्या केवळ हाय पॉइंटवरच करायला हवा. जसे की, कपाळ, हनुवटी, नाक इत्यादी.

५) शिमरपासून दूर रहा - जास्तीत जास्त महिलांना ग्लोई मेकअप लूक फार पसंत असतो. पण नॅच्युरल  ग्लोई मेकअप आणि जास्त शिमरचा वापर करुन मेकअप ग्लोई करण्यात अंतर असतं. उन्हाळ्यात क्रीम फांउडेशन लावणे टाळा. कारण याने चेहऱ्यावर अधिक घाम येतो आणि मेकअप लवकर खराब होतं. 

(टिप : वरील टिप्स किंवा सल्ले वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे वरील टिप्सचा सर्वांना फायदा होईलच असं नाही. आम्ही तसा दावाही करत नाही.)

Web Title: Summer make up tips for long lasting fresh look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.