केस विंचरण्यासाठी 'हा' कंगवा वापरणं असतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:20 PM2018-08-16T18:20:40+5:302018-08-16T18:22:51+5:30

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काहीजणं तर डॉक्टरांचाही सल्ला घेतात. पण अशातच आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.

start using wooden comb to keep hair and scalp healthy | केस विंचरण्यासाठी 'हा' कंगवा वापरणं असतं फायदेशीर!

केस विंचरण्यासाठी 'हा' कंगवा वापरणं असतं फायदेशीर!

googlenewsNext

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काहीजणं तर डॉक्टरांचाही सल्ला घेतात. पण अशातच आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती म्हणजे आपण केस विंचरण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या कंगव्याचा वापर करतो त्याबाबत. केसांचं आरोग्य राखण्यासाठी योग्य कंगवा वापरणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिकऐवजी लाकडाच्या कंगव्याने केस विंचरणं फायदेशीर आहे. प्लॅस्टिकमध्ये असलेले केमिकल्स केसांना नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे लाकडाच्या कंगव्याने केस विंचरणं केसांचं आरोग्या राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 
लाकडाचा कंगवा अॅन्टी-सेफ्टीक असण्यासोबतच नॉन-टॉक्सिक असतात. यामुळे केसांना आणि डोक्याच्या त्वचेला फायदा होतो. 

लाकडाच्या कंगव्याचे फायदे -

- हेअर फॉलिकल्सचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 

- केसांचा गुंता होणं कमी होतं. 

- केस दुभंगण्याच्या समस्येपासून सुटका होते. 

- कुरळ्या केसांचा गुंता पटकन होतो, पण साकडाचा कंगरवा वापरल्यामुळे गुंता लवकर सोडवण्यास मदत होते. 

- केसांचं गळणं आणि केस तुटण्याची समस्या कमी होते. 

- डोक्याच्या त्वचेला कमी नुकसान होतं. 

केस सारखे विंचरल्यामुळेही केसांना फार नुकसान पोहोचतं. त्यामुळे ठराविक काळानंतरच केस विंचरावे. जास्त केस विंचरल्यामुळे केसांमध्ये ड्रायनेस येतो मात्र डोक्याची त्वचा तेलकट होते. तेच कमी वेळा केस विंचरल्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे केस विंचरताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसातून 3 ते 8 वेळाच केस विंचरावे. त्यामुळे केसांना कमीत कमी नुकसान पोहोचतं. 

Web Title: start using wooden comb to keep hair and scalp healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.