So do not worry about beauty! | म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको!

बहुतांश महिला-तरुणी सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात.एखाद्या कार्यक्रमप्रसंगी मेकअप करण्यासाठी प्रसाधनांचा वापर ठिक आहे, मात्र रोजच वापर करत असाल तर मात्र त्वचा आणि केसांवर याचा दुष्परिणाम जाणवू लागतो.काही प्रसाधने असे असतात की,त्यांचा सतत वापर करणे धोक्याचे ठरते.  

* ब-याचदा केस धुवायला वेळ मिळत नाही म्हणून ड्राय शॅम्पू वापरला जातो.मात्र याचा अतिवापर केसांना रुक्ष आणि कमजोर बनवू शकतो.याने केस गळतीही होते शिवाय केसांची गुणवत्ताही घटते.

* डिप कंडिशनरच्या अतिवापराचाही केसांवर दुष्परिणाम होतो.डिप कंडिशनरने केस जरी सुंदर दिसतात मात्र याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं.   

* बरेचजण फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरतात, मात्र सततच्या वापराने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते.

* मेकअप करण्या-यांना हा प्रॉडक्ट वापरणे अत्यंत आवडतो कारण याने त्वचेवरील सर्व डाग लपून जातात.जर आपल्या प्रायमरमध्ये सिलिकॉन आहे आपण हे रोज वापरत असाल तर याने त्वचेवरील छिद्र बंद होऊ शकतात.ज्यामुळे त्वचा खरखरीत आणि वाईट दिसू लागते.


* रोज डोळ्यांना मस्करा लावल्यानेही दुष्परिणाम होतो.मस्करा लावल्याने डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात.परंतू दररोज वाटरप्रूफ मस्करा वापरल्याने लॅशेज वाळू लागतात.म्हणून हे दररोज वापरणे टाळावे. 
Web Title: So do not worry about beauty!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.