आपल्या डोक्यावर केस नसतील आणि आपणास टक्कल पडली असेल तर निराशा तर होईलच. बऱ्याचदा अशा लोकांना टिकेला सामारे जावे लागते. त्यांच्यावर हास्यापद जोक देखील केले जातात. काही लोक यांपासून सुटका मिळण्यासाठी लाखो रुपये खर्च हेअर ट्रांसप्लांटदेखील करतात. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे टक्कल असूनही आपण स्मार्ट दिसू शकता. 

नेहमी आपल्या वेगवेगळ्या आणि आकर्षक हेअर स्टाइलने ओळखले जाणाऱ्या सेलिब्रिटींची बऱ्याच चित्रपटांमध्ये टक्कल दिसते. त्यांचा हा लूक खरच आगळावेगळा व आकर्षक वाटतो. 

* कसे दिसाल स्मार्ट 
* केस 

काही लोकांसाठी टक्कल ही एक फॅशन स्टेटमेंट बनली आहे. जे लोक फॅशनसाठी टक्कल ठेवतात ते नियमित डोक्यावर उगणाऱ्या केसांना ट्रिमिंग करुन घेतात. शिवाय डोक्यावरील त्वचा कोरडी झाल्यानंतर मॉइश्चरायजर किंवा तेल लावतात. काही जण तर सनस्क्रीमदेखील लावतात.  

Image result for how-to-look-smart-even-with-baldness

* दाढी
डोक्यावर केसांचे प्रमाण कमी असेल तर आपल्या दाढीवर लक्ष द्यावे. अशा लोकांनी जर फ्रेंच बियर्ड किंवा लहान दाढी, जी ओठांच्या खाली तुरडक ठेवली जाते, यामुळे आपण स्टायलिश आणि आकर्षक दिसू शकता. शक्यतो संपूर्ण क्लिन शेव करु नये. * व्यक्तिमत्त्व
टक्कलच्या समस्येने त्रस्त असलेले लोकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष दिल्यास आपण खूपच स्टायलिश दिसू शकता. यासाठी मात्र आपणास जिम जाऊन थोडे पिळदार शरीर बनवावे लागेल. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि पिळदार शरीरयष्टी असेल तर आपल्याकडे लोक नक्कीच पलटून पाहतील.  * टॅटू 

सध्या स्टायलिश दिसण्यासाठी बहुतेकजण टॅटू बनवितात. ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत अशा लोकांनी जर छातीवर टॅटू बनविला तर त्यांचा लूक रफ अ‍ॅण्ड टफ दिसू शकतो ज्या कारणाने ते अजून स्मार्ट दिसतील.  * कपडे  
टक्कल असलेल्या लोकांनी नेहमी फिटिंगचेच कपडे परिधान करावे. आक र्षक दिसण्यासाठी त्यांनी आपल्या कपड्यांकडे विशेष लक्ष द्यावे. अशा लोकांना जास्त टाइट आणि जास्त लूज असे कपडे परिधान करु नये.   
Web Title: Smart Tips: Baldness? Do not be disappointed, if you follow these tips, then smart smart!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.