Slim girls look stylish! | ​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश!

 ज्यांचे शरीर फिट असते त्यांना कोणत्याही प्रकारचे कपडे छान वाटतात, मात्र ज्यांची शरीरयष्टी सळपातड असते ते नेहमी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असता. कारण त्यांना बरेच कपडे सूट करत नाहीत.  आज आम्ही आपणास सांगणार आहोत की, कशा प्रकारचे कपडे तुमच्यावर चांगले दिसतील. जाणून घ्या सळपातळ मुली कशाप्रकारे स्टायलिश दिसतील. 
असेच कपडे शोधा जे तुम्हाला शोभून दिसतील. असा ड्रेस ज्यात जास्त कपडा असेल. तुम्ही अशा कपड्यामध्ये तुमचे दिसणेच बंद होईल. साधे आणि आणि व्यवस्थित कपडे तुमला शोभून दिसतील.

* आपल्या सडपातळ शरीराला लपविण्यासाठी मोठ्या आकाराचे कपडे घालू नका. तुम्ही तुमच्या मोठ्या भावंडांकडून मागून कपडे घातले आहे, असे इतरांना वाटू नये.

* तुम्हाला परफेक्ट फिट कपडे शाधण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल. त्यासाठी तुम्ही तुमचे कपडे शिवून त्याला फिट करुन तेच घालू शकता.* तुमच्यासाठी स्किनी जीन्स योग्य ठरेल. पण, लक्षात ठेवा की, तुम्ही अल्ट्रा स्किनी जीन्स विकत घेऊ नका. तुम्ही बूटलेग स्टाइलची जीन्स देखील घालू शकता. तुम्ही बॉयफ्रेंड कट पासून लांबच रहा.

* असे कपडे परिधान करा जे तुम्हाला काही कर्व्स देखील देतील. जसे की तुम्ही पेप्लूम टॉप्स घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला योग्य शेप मिळेल. तुम्ही फ्रिल्स देखील घालू शकता. 

Web Title: Slim girls look stylish!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.