Shocking: If Sunny Leone is a die-hard fan, do not watch this video, Basu jolts! | Shocking : सनी लिओनीचे डाय-हार्ड फॅन असाल तर कदापी पाहू नका हा व्हिडिओ, बसेल जोराचा धक्का !

सनी लिओनीचे फॅन्स तिच्या आगामी प्रोजेक्टच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनीने या प्रोजेक्टच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता वाढविण्याचे काम केले आहे. त्यातच नुकताच तिने एक व्हिडिओ जाहिर केला असून तो व्हिडिओ पाहून तिच्या डाय-हार्ड फॅन्सला मोठा धक्काच बसू शकतो. यासाठी जर आपण सनी लिओनीचे फॅन असाल तर हा व्हिडिओ पाहू नये. इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ सनीने शेअर केला असून त्यात ती आपल्या चेहऱ्याची त्वचा काढताना दिसत आहे.
 
सनी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेते आहे. हा मेकअप करायला कधी कधी चार ते पाच तास तर अगदी कधी बारा ताससुद्धा लागू शकतात. तेव्हा जाऊन हा मेकअप होतो. सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले तर तिला नेहमीच काही तरी चॅलेजिंग करायला आवडते. तसेच ती आपल्या कामासाठी किती ही वेळ द्यायला तयार असते. त्यामुळे आज सनी अनेक निर्मांत्यांची फेव्हरेट बनली आहे. 

खरे तर, प्रोस्थेटिक किटसोबत मस्ती करताना सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती खूप घाबरलेल्या अवस्थेत स्वत:च्या गालावरील त्वचा काढताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, ‘मला असे करताना खूप आनंद मिळला..’ 

वेगाने व्हायरल होण्याऱ्या या व्हिडिओला ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. गेल्या आठवड्यात सनीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते, जे खूप वेगाने व्हायरल झाले होते. त्यात तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. मास्कसोबतही तिने अन्य एक फोटोदेखील शेअर केला होता, ज्यात ती ओळखली जात नव्हती. भलेही सनी या प्रोजेक्टबाबत काहीही सांगण्यास तयार नसेल मात्र असे वाटते की, हॉररविषयी काहीतरी असेल.
 
याबाबत तिने फक्त एवढेच सांगितले आहे की, ‘आता मी या प्रोजेक्टवर काम करीत असून ज्याची माहिती अजून सार्वजनिक झालेली नाही. याबाबत जाणून घेण्यासाठी मात्र आपणास वाट पाहावी लागेल. मी आता स्वत:चे कॉस्मेटिक ब्रँड स्टारस्ट्रक सुरु करणार असून त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे.’  Web Title: Shocking: If Sunny Leone is a die-hard fan, do not watch this video, Basu jolts!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.