Now use the 'backless blouse'! | आता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज' !

सध्या बॅकलेस ब्लाऊजची फॅशन जोर धरत आहे. बहुतांश महिला बॅकलेस ब्लाऊजचाच वापर करताना दिसत आहेत. मात्र त्यासाठी आपली पाठ सुंदर असायला हवी. जर पाठीचे सौंदर्य खराब असेल तर इच्छा असूनही आपण बॅकलेस ब्लाऊजचा वापर करु शकत नाही. बॅकलेस ब्लाऊज साडीच्या सुंदरतेत अधिक भर घालते. अशावेळी तुमची पाठ सुंदर व आकर्षक दिसणे आवश्यक आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची पाठ सुंदर दिसेल.

* स्किन ब्राईटनिंग 
या ट्रिटमेंटसोबत प्रभावी अँटीआॅक्सिडंट देणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन किंवा मॅसोथेरपी घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचा रंग साफ होऊन तुमची पाठ गोरी दिसेल. हे अँटीआॅक्सिडंट ग्लूटॅथिआॅन नावाने ओळखले जाते.

* पार्टी पील्स
ही फार प्रसिद्ध उपचार पद्धत आहे. याला पार्टी पील किंवा सुपर पील्स म्हणतात. यामध्ये कुठल्याच प्रकारचे पीलींग होत नाही तर यात शरीराची कांती वाढवण्यासाठी उपचार केले जातात. यामुळे तुमची पाठ सुंदर व गोरी बनेल.

* स्किन पॉलिशिंग
तुम्हाला मऊ व चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही ही उपचार पद्धत वापरू शकता. यामध्ये लॅक्टिक किंवा ग्लायकोलिक पील वापरतात. हे तुमची खराब त्वचा काढून त्वचेला साफ व चमदार बनवते.

* केमिकल पील 
हे पिग्मेंटेशन, डाग घालवायला मदत करते. यामध्ये त्वचेच्या वरचा थर काढून आतील थर वर आणल्या जातो. यासाठी दोन आठवडे लागतात. चांगल्या परिणामांसाठी ६ ते ८ वेळा हे करावे लागेल. हे उपचार महाग असतात. स्किन पॉलिशिंगसाठी १ हजार ते ३ हजार रुपये खर्च येतो. जर खोल पीलींग करायचे असेल तर हा खर्च २,५०० ते ३०,००० पर्यंत जातो.

* घरगुती उपाय 
पाठीची मृत त्वचा काढण्यासाठी लिंबाने घासून त्यावर स्क्रब लावा. हे पाठीला घासल्याने टॅनिंग निघून त्वचा मऊ होते. 
Web Title: Now use the 'backless blouse'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.