Night sleep and beauty | रात्रीची झोप आणि सौंदर्य


रात्रीची शांत आणि सुखाची झोप तुमच्या आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि मनासाठी उत्तम असते. तुम्ही कसे झोपता यावरुन तुमचा चेहरा, त्वचा आणि एकंदरच तुमचा लूक दिसून येतो. चांगली झोप स्वत:लाच टवटवीत बनविते आणि दिवसभरासाठी तुम्हाला अधिक ताकद, ऊर्जा देते. दिवसभर तुमच्या त्वचेला चकाकी देण्याचेही काम करते. तुमच्या दिवसभरातील काम चांगल्या पद्धतीने व्हावे असे वाटत असेल तर तुमचे शरीर आणि मन चांगले असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरामदायी आणि शांत राहण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्युटीशियन आणि हेअर कन्सल्टंट सुनीता मोटवानी-मखिजा याबाबत सांगत आहेत...
चांगल्या झोपेसाठी काही टिप्स...
तुम्ही जण तणावात असाल तर लगेचच झोपायला जाऊ नका. तुम्ही झोपेसाठी प्लॅन करा. यासाठी पुस्तके वाचा किंवा छानपैकी गाणं ऐका ज्यायोगे तुम्ही स्वत:ला रिलॅक्स करु शकाल.
खूप उशिराने रात्री जेऊ अथवा पिऊ नका. जोपर्यंत तुमच्यातील पचनाची क्रिया सुरू असते, तोपर्यंत शरीर विश्रांती घेऊ शकत नाही. 
रात्री कोमट पाण्याने किंवा कमी गरम पाण्याने अंघोळ करा. चांगल्या तेलाने आपले अंग भिजवून घ्या. यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल.
तुम्हाला ज्यावेळी झोप येत नसेल त्यावेळी अगदी सोपी उत्तरे आहेत. तुम्हाला झोपण्याची गरज नसते. स्वत:ला झोपेच्या अधीन करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळी तुमचे शरीर थकलेले असेल त्यावेळी तुमचे डोळे आपोआप मिटले जातील. दरम्यान, तुम्ही वाचा किंवा काही संगीत ऐका.
आराम हा गरजेचा आहे. तुमचा बेड हा कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही सहज झोपू शकत नाही.
झोपत असताना तुम्ही तुमचे सगळे प्रश्न विसरून जा. झोपेमुळे तुम्हाला आराम मिळेल आणि सकाळी तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल. दिवसभराच्या आव्हानांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता.  
प्रत्येक दिवशी आपल्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थांवर झोप मात करते. वयोमानानुसार होणाऱ्या हानीइतकाच झोपेमुळे शारीरिक परिणाम होतो. आपल्या मेंदूतील प्रत्येक पेशींदरम्यान एकमेकांशी परमाणू जोडले गेलेले असतात. ते झोपेच्या महत्त्वासंदर्भात जोडले गेलेले असतात.  तुमचे सौंदर्य आणि अधिक उत्तम शरीर तसेच तंदुरुस्तीबाबत महत्त्वाचे आहे.
प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारची रात्र पार्टी नाईट म्हणून ओळखली जाते. तथापि रविवारी रात्री तुम्ही छानपैकी झोपून जा. पुढच्या आठवडाभर अधिक ताजेतवाने राहण्यासाठी ते उपयोगी पडेल.

Web Title: Night sleep and beauty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.