Navratri 2018 : नवरात्रीच्या मेकअपसाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:42 PM2018-10-10T12:42:59+5:302018-10-10T12:44:37+5:30

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आता गरबा रसिकांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळे लूक्स ट्राय केले जातात. अशावेळी गरबा रसिकांसाठी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांच्या काही मेकअप टिप्स सांगणार आहोत.

Navaratri 2018 : make up shahnaz hussain tips you can follow this navratri | Navratri 2018 : नवरात्रीच्या मेकअपसाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स!

Navratri 2018 : नवरात्रीच्या मेकअपसाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स!

Next

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आता गरबा रसिकांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळे लूक्स ट्राय केले जातात. अशावेळी गरबा रसिकांसाठी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांच्या काही मेकअप टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही नवरात्रीसाठी हटके मेकअप करून सर्वांपेक्षा वेगळे दिसू शकता. 

नवरात्रीसाठी तुम्ही गोल्ड फाउंडेशनचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे गालांवर हलक्या ब्लशरचाही वापर करू शकता. तुम्ही पावडर ब्लशरच वापर करू शकता. 

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी डोळ्यांच्या वरच्या पापणीवर हलक्या ग्रे कलरची शेड लावा आणि क्रिजमध्ये डार्क ग्रे रंगाचा वापर करा. डोळ्यांना डार्क आय पेन्सिल किंवा आय लायनरच्या मदतीने सजवा. वरच्या लेयरवर डार्क आय शॅडो लावल्याने वेगळा लूक मिळण्यास मदत होईल. 

पायांमध्ये पैंजण आणि रंगी-बेरंगी बांगड्यांसह राजस्थानी झुमके घालून तुम्ही तुमच्या लूकमध्ये आणखी भर पाडू शकता. केसांमध्ये गजरे किंवा हेयर एक्सेसरीजचा वापर केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल. जर रात्री उशीरापर्यंत गरबा खेळणार असाल तर वॉटरप्रुफ मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा. यामुळे घाम आला तरीदेखील मेकअप खराब होणार नाही. 

भारतीय त्वचेसाठी लाल, पीच, स्ट्रॉबेरी रेड यांसारख्या शेड्सच्या लिपस्टिक्स फार शोभून दिसतात. डार्क पिंक किंवा रेडिश पिंक रंगाची लिपस्टिकसुद्धा शोभून दिसेल. त्याचप्रमाणे ऑरेंज शेडचाही वापर करू शकता. त्याचसोबत ऑरेंज शेड सावळ्या स्किनसोबतच गोऱ्या स्किनसाठीही फायदेशीर ठरतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये आणखी भर टाकण्याचं काम टिकली करेल. तुमच्या ड्रेसला मॅचिंग टिकली तुम्ही लावू शकता. 

Web Title: Navaratri 2018 : make up shahnaz hussain tips you can follow this navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.