'या' छोट्या छोट्या गोष्टी पुरुषांना करतील अधिक हॅन्डसम, एक्सपर्टच्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:06 PM2018-10-11T13:06:19+5:302018-10-11T13:07:13+5:30

आता ते दिवस गेलेत जेव्हा केवळ महिला मेकअप करायच्या आणि आपल्या सुंदरतेबाबत गंभीर राहत होत्या.

Men's grooming tips for Sjin hair and all over body hygiene | 'या' छोट्या छोट्या गोष्टी पुरुषांना करतील अधिक हॅन्डसम, एक्सपर्टच्या टिप्स!

'या' छोट्या छोट्या गोष्टी पुरुषांना करतील अधिक हॅन्डसम, एक्सपर्टच्या टिप्स!

Next

आता ते दिवस गेलेत जेव्हा केवळ महिला मेकअप करायच्या आणि आपल्या सुंदरतेबाबत गंभीर राहत होत्या. आताच्या लाईफस्टाईलमध्ये पुरुषही महिलांप्रमाणे आपल्या लूक, ड्रेसअफ आणि ग्रुमिंगबाबत गंभीर झाले आहेत. त्यांनाही आता या गोष्टींची काळजी घेणे त्यांच्या प्रोफेशनल लाइफसाठी फायद्याचं ठरत आहे. 

ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पुरुष दुर्लक्ष करत होते त्याच गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीला आणखी चांगलं करु शकतात. त्यामुळे पुरुषांना आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पर्सनॅलिटी आणखी आकर्षक करु शकता.  

स्किनसाठी टिप्स

- आठवड्यातून कमीत कमी एकदा स्क्रबचा वापर करा आणि रोज एखाद्या चांगल्या फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा.

- रात्री झोपण्यापूर्वी चेहरा चांगल्याप्रकारे धुवा.

- रोज फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करु नका, कारण याने त्वचेवर कोरडेपणा, जळजळ आणि सूज येऊ शकते.

- त्वचा चांगल्याप्रकारे मॉश्चराईज करा आणि बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. 

केसांसाठी खास टिप्स

- केसांवर कोणतही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी एकदा एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. जर केस पातळ असतील तर स्प्रेचा वापर करु नका. 

- शॅम्पूचा वापर जास्त करु नका. शम्पू लावल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने केस धुवा.
चेहरा असा करा ग्लो

- दाढी स्वच्छ आणि चेहरा आकर्षक दिसावा यासाठी आठवड्यातून एकदा दाढी ट्रीम करा.

- दाढीचे केस चमकदार दिसण्यासाठी बियर्ड ऑईलचा वापर करा.

- दाढी करण्याआधी ब्लेड काही वेळ गरम पाण्यात ठेवा. याने त्वचेला काही नुकसान होणार नाही.

- दाढी केल्यावर चेहऱ्यावर शेविंग ऑईल लावा. याने चेहरा चांगला दिसेल. 

बॉडी हायजिन

- साबण आणि फेसवॉशचा वापर नियमीतपण करा आणि रोज आंघोळ करा.

- आंघोळ केल्यावर घामाचे कपडे पुन्हा परिधान करु नका.

- आपल्या अंडरआर्म्सची चांगल्याप्रकारे स्वच्छता करा. 

हातांची आणि पायांची काळजी

- आठवड्यातून एकदा आपल्या हातांचे आणि पायांचे नखे काढा. नखे काढण्याआधी कोमट पाण्याने एकदा धुवा. 

- आठवड्यातून एकदा हातांची आणि पायांची क्लीन्जिंग किंवा स्क्रब करा. 

- पायांची खाज आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी पावडरचा वापर करा.
 

Web Title: Men's grooming tips for Sjin hair and all over body hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.