मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:16 PM2019-01-31T18:16:14+5:302019-01-31T18:23:36+5:30

महिलांप्रमाणेच पुरूषांचीही इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले असून ते सतत आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात.

Mens beauty products for looking handsome and smart | मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

महिलांप्रमाणेच पुरूषांचीही इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले असून ते सतत आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात. एखाद्या अभिनेत्याप्रमाणे आपणही स्मार्ट आणि कूल दिसावे असे अनेक पुरुषांना वाटत असते. फ्रेश लूक मिळवण्यासाठी पुरूष काहीही करण्यासाठी तयार असतात. महागड्या फेअरनेस क्रिम पासून ते अगदी मोठ्या-मोठ्या सलूनपर्यंत सगळे उपाय ट्राय करत असतात. अनेकदा महिलांच्या बॅगमध्ये मेकअप किट असतं किंवा ब्युटी प्रोडक्ट्स असतात. मात्र पुरूषांकडे तसं काही नसतं. आज आम्ही तुम्हाला अशा काही ब्युटी प्रोडक्ट्सबाबत सांगणर आहोत. जे प्रत्येत पुरूषाकडे असणं आवश्यक आहेत. हे प्रोडक्ट्स त्वचेचं आरोग्य राखण्यासोबतच फ्रेश लूक देण्यासाठीही मदत करतात. 

बॉडी वॉश

बॉडी वॉश पुरूषांसाठी सर्वात महत्त्वाच्या ब्युटी प्रोडक्ट्सपैकी एक आहे. बॉडी वॉशमध्ये सोडियम हायड्रॉक्साइडचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. 

शेविंग क्रिम

शेविंग क्रिमचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम बनते. त्याचबरोबर यामुळे शेविंग करताना चेहऱ्यावर जखमाही होत नाहीत. ग्लिसरीन आणि शिया बटरचा वापर केलेला असल्यामुळे शेविंग क्रिम त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मदत करतं. 

इलेक्ट्रिक शेवर

सामान्यतः शेविंग मशिनचा वापर केल्याने जखम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे इलेक्ट्रिक शेवर मशिनचा वापर केल्याने दाढीचे केस सॉफ्ट होतात. 

नाइट क्रिम

रात्रीच्यावेळी त्वचेमध्ये डॅमेज रिपेअरिंगची प्रक्रिया होत असते. अशातच रात्री झोपण्यापूर्वी आपले हात-पाय धुतल्यानंतर क्रिम अप्लाय करून झोपा. यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची त्वचा चमकदार दिसतेच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. 

पोस्ट शेव लोशन

नेहमी दाढी केल्यानंतर अनेक लोक आफ्टर शेविंग लोशनचा वापर करत नाहीत. तर लोशनचा वापर करणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे दाढी केल्यानंतर आफ्टर शेविंग लोशनचा वापर करा. 

परफ्यूम

तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये भर घालण्यासाठी कपड्यांसोबतच परफ्यूमही तितकाच महत्त्वाचा ठरतो. चांगला गंध असणारा परफ्यूम तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर घालण्याचे काम करत असतो. 

Web Title: Mens beauty products for looking handsome and smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.