दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:04 PM2019-01-23T12:04:57+5:302019-01-23T12:09:11+5:30

अनेकांना असं वाटतं की, दुधाची साय म्हणजेच मलाई नुकसानकारक असते. त्यामुळे अनेकजण ती फेकून देतात.

Malai is very beneficial for healthy skin | दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

googlenewsNext

अनेकांना असं वाटतं की, दुधाची साय म्हणजेच मलाई नुकसानकारक असते. त्यामुळे अनेकजण ती फेकून देतात. पण स्कीन एक्सपर्ट्स सांगतात की, ही साय नुकसानकारक नाही तर त्वचेसाठी फायदेशीर असते. दुधाच्या या सायीमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. ज्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ दुधाच्या सायीचे त्वचेला होणारे फायदे....

कसा कराल वापर?

दुधातून तयार होणारी साय तुम्ही त्वचेवर तशीच लावू शकता. तसेच यात तुम्ही लिंबाचा रस, गुलाब जल, दूध, हळद आणि दालचीनी मिश्रित करुनही लावू शकता. याने तुमच्या स्कीनला अधिक फायदा होतो. एक्सपर्ट्सनुसार, सायीचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत, त्यामुळे हे कशाप्रकारेही त्वचेवर लावू शकता आणि याचा फायदा तुम्हाला लवकर बघायला मिळतो.

अ‍ॅंटी-एजिंग

त्वचा तरूण ठेवण्यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅंटी-एजिंग क्रीम लावून थकले असाल तर सायीचा वापर करा. या सायीचा वापर तुम्ही रोज फेस पॅक म्हणून किंवा स्क्रब म्हणून रोज करू शकता. यातील प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून रोखतात. ज्यामुळे तुमची त्वचा फार जास्त काळ ग्लोइंग आणि टवटवीत दिसते. 

डार्क स्पॉट दूर करण्यास फायदेशीर

जेव्हा साय लिंबाच्या रसासोबत लावली जाते तेव्हा साय डेड स्कीन सेल्सना पुन्हा सक्रीय करते. याने डार्क स्पॉट्स दूर होण्यास मदत होते. साय आणि लिंबाचं मिश्रण स्कीनवर हळुवार लावा, सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्याने डार्क स्पॉट्स दूर होतात. 

त्वचेचा रंग उजळतो

ब्यूटी एक्सपर्ट्सनुसार, होममेड सायीमध्ये अससेलं लॅक्टिक अ‍ॅंसिड टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. याने त्वचा डी-टॅन होते, ज्यामुळे त्वचा उजळते. सोबतच याने त्वचा हेल्दीही होते.  

Web Title: Malai is very beneficial for healthy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.