चमकदार आणि मुलायम केसांसाठी असा करा दह्याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 08:32 PM2019-05-24T20:32:46+5:302019-05-24T20:36:18+5:30

दही फक्त खाण्याचा आनंदच द्विगुणित करत नाही तर त्वचा आणि केसांसाठीही हे अत्यंत गुणकारी ठरतं. जर आतापर्यंत तुम्ही दह्याचा समावेश फक्त डाएटमध्येच केला असेल तर केसांसाठीही याचा वापर करा.

Know how to use dahi for hair also know what to use with dahi for hair growth and silky lusture | चमकदार आणि मुलायम केसांसाठी असा करा दह्याचा वापर

चमकदार आणि मुलायम केसांसाठी असा करा दह्याचा वापर

googlenewsNext

दही फक्त खाण्याचा आनंदच द्विगुणित करत नाही तर त्वचा आणि केसांसाठीही हे अत्यंत गुणकारी ठरतं. जर आतापर्यंत तुम्ही दह्याचा समावेश फक्त डाएटमध्येच केला असेल तर केसांसाठीही याचा वापर करा. कारण हे केसांसाठी एक उत्तम टॉनिक आहे. दह्यामध्ये अॅन्टी-फंगल प्रॉपर्टिज असतात, ज्या स्काल्प क्लियर करण्याचं आणि केसांमधील डँड्रफ दूर करण्याचं काम करतात. एवढचं नाही तर हे स्काल्पचं पीएच लेवलही मेन्टेन करतात आणि सीबमचं प्रोडक्शन करण्यासाठी मदत करतात. सीबम स्किनमध्य असलेलं सिबेसियस ग्लँड्समधून(Sebaceous glands) येणारं ऑयली किंवा वॅक्ससारखं तत्व असतं. जे स्किन आणि केसांना मॉयश्चराइझ्ड करतात. 

दही केस सिल्की, चमकदार आणि हेल्दी करण्याचं काम करतात. त्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा तरी केसांमध्ये दही लावलं तर महिन्याभरातच तुम्हाला फायदा दिसून येईल. परंतु हा पॅक केसांना कसा लावावा हे पण माहीत करून घेण गरजेचं आहे. दह्यामध्ये जर मेथीचे दाणे एकत्र केले तर केसांसाठी ते खरचं फायदेशीर ठरतं. कारण मेथी स्काल्पमधये असलेले बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. हेअर फॉलिकल्स मजबूत करून केसांना हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. 

केसांमध्ये दही लावण्याची योग्य पद्धत... 

दह्यामध्ये मेथी एकत्र करा 

सर्वात आधी 2 चमचे मेथीचे दाणे घ्या आणि ते अर्धा कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी एक कटोरी दही घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. आता त्यामध्ये मेथीचे दाणे वाटून पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये दही एकत्र करा. आता हा पॅक केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा लावल्यानंतर केसांना हेअर कॅपने कव्हर करा. 1 ते 2 तासापर्यंत असचं राहू द्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून टाका. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून केस पुन्हा धुवून टाका.  

दह्यामध्ये अंड एकत्र करून लाव 

दह्यामध्ये अंड एकत्र करून लावता येऊ शकतं. कारण अंड्यामध्ये मुबलक प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं आणि केसांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं. त्यामुळे दही आणि अंडही केसांसाठी परफेक्ट मिश्रण आहे. त्यासाठी अंड फेटून घ्या आणि ते एक वाटी दह्यामध्ये एकत्र करा. तयार पॅक व्यवस्थित करून केसांना लावा आणि त्यानंतर पुन्हा एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

दही आणि कोरफड 

दह्यामध्ये कोरफड एकत्र करून लावल्यानेही फायदा होतो. कोरफडीमध्ये प्रोटियोलिटिक एंजाइम्स (proteolytic enzymes) असतात. जे स्काल्पवरून डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात. कोरफड केसांची वाढ होण्यासाठीही फायदेशीर ठरते. याशिवाय कोरफड केस वाढविण्यासाठी, कोंडा दूर करण्याव्यतिरिक्त एक उत्तम कंडिशनर म्हणूनही काम करतं. 

कोरफडची ताजी पानं घेऊन त्यातील गर काढून घ्या आणि त्यानंतर तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता हे एक वाटी दह्यामध्ये व्यवस्थित एकत्र करा. थोडीशी मध एकत्र करून  तयार पॅक केसांना लावा आणि त्यानंतर 1 ते 2 तासांनी शॅम्पूने धुवून टाका. या तीन पद्धतींना जर तुम्ही आठवड्यातून एक-दोन तरी फॉलो केलं तर काही वेळातच तुम्हाला फायदा मिळू शकतो. खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला यामुळे काहीही साइड इफेक्ट्स होणार नाहीत. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

Web Title: Know how to use dahi for hair also know what to use with dahi for hair growth and silky lusture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.