Keep these things in mind if you are going to | ​जीमध्ये जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा


तंदुरूस्त राहण्यासाठी जीम जॉईन करणे  ही आजघडीला खूप कॉमन गोष्ट झाली आहे. काहीजण तर एकदिवसही न चुकता  नियमितपणे जीमला जातात. योग्यरित्या एक्सरसाईज केल्यानंतर जीमचा फायदा होतो. योग्य एक्सरसाईज, उत्तम आहार व जीमसाठी आवश्यक कपडे व बूटचा  वापर करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्याची ही खास माहिती. 

बुट : बेसिक एक्सरसाईज करण्यासाठी बूट हे आवश्यक आहेत. त्यामुळे पायाची सुरक्षीतता होते व तंदुरुस्तही  राहता येते. 
घाम शोषून घेणारे टी शर्ट : जीममध्ये जाण्याच्या अगोदर घाम शोषून घेणारे टी शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. अशा शर्टने  घामामुळे  तुम्ही भिजत असल्याचे  दिसणार नाही. 

फिटनेस ट्रॅकर : आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिटनेस ट्रॅकरचा वापर करावा. त्यामुळे हृदयाची गती व कमी होणाºया कॅलेरीची माहिती मिळते. 

नवीन सॉक्स : आपल्या कपड्यांच्या अलमारीमध्ये कमीत कमी सात सूती सॉक्सचे जोड ठेवावे. या सूती सॉक्समुळे घाम शोषला जाऊन दुर्गंधी व फोड येण्याचाही धोका राहत नाही. 
Web Title: Keep these things in mind if you are going to
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.