How to save energy in salon? | सलोनमध्ये ऊर्जा बचत कशी कराल?

सर्वसाधारणपणे फायदा म्हणजे खर्च वगळता मिळालेले उत्पन्न. सलोनमध्ये सर्वाधिक खर्च हा विजेवर केला जातो. या ठिकाणी ऊर्जेची बचत ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यात ऊर्जेचे महत्त्व आपणास लक्षात येईल. या ठिकाणी सलोनमध्ये उर्जेवरील खर्च कसा कमी करावा याची माहिती देत आहोत....
तुमच्याकडे असणारे सर्व कर्मचारी आणि सदस्यांना या प्रयोगात सामील करुन घ्या. यामुळे तुमच्या सलोनच्या वीज खर्चाच्या रकमेत बचत व्हावी या उद्देशाने अधिक प्रयत्न करता येतील. तुमच्या कर्मचाºयांना व्यवसायाचे महत्व समजावून सांगा. तुमच्याप्रमाणेच त्यांचीही बचत करण्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आणून द्या आणि त्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण द्या.
या वेळी पर्यावरणीय प्रश्नांबाबत जाणीव जागृती करा. पर्यावरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असावा या संदर्भात सांगितल्यानंतर त्यांनाही याकडे अगदी सहज पद्धतीने पाहता येईल व काम करता येईल. यामुळे खर्चाच्या बचतीत होणारा मोठा परिणाम त्यांना अनुभवता येईल. पाणी आणि उर्जेची बचत आणि त्याचे फायदे भविष्यात कशा पद्धतीने केले जाईल यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करा.
पाण्याचा वापर टाळा. प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा असून, शाम्पू एरियामध्ये जेव्हा तुम्हाला गरज असेल, त्यावेळेसच पाणी सोडा. त्याशिवाय ग्राहकांसाठी शाम्पू करीत असताना उगीचच पाण्याचा वापर करु नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पुढच्या काळात उपयोगी पडू शकतात.
सलोनमध्ये इकोफ्रेंडली डिसपोजेबल टॉवेल्सचा वापर करा. यामुळे तुमच्या खर्चातही बचत होईल. हे पुनर्चक्रीकरण पद्धतीने तयार करण्यात आले असले पाहिजेत. वॉशिंग मशीन आणि ड्रायरमुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो.
सलोनमध्ये प्रकाश केव्हा असावा यासंदर्भात टाईम सेट करा. नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष द्या. त्यासाठी मोठ्या खिडक्या, ऊर्जा बचत करणारे बल्ब वापरा. उपकरणाशेजारील स्वीच बंद न करता मेन स्वीचपासून मशीन बंद करा.
जुनी उपकरणे वापरु नका. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्ची पडते. एअर कंडीशनर, फ्रीज, ड्रायर हे वेळोवेळी बदला. जुन्या उपकरणांचा फारसा वापर करु नका.

सुनीता मोटवानी-माखिजा
आंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सल्टंट

Web Title: How to save energy in salon?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.