दाढी वाढवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:52 PM2018-07-20T15:52:19+5:302018-07-20T15:57:20+5:30

सध्याच्या फॅशनच्या युगामध्ये कोणती फॅशन कधी लोकप्रिय होईल हे सांगणं कठीणचं आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लिन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत.

home remedies for to take care of beard | दाढी वाढवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

दाढी वाढवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

googlenewsNext

सध्याच्या फॅशनच्या युगामध्ये कोणती फॅशन कधी लोकप्रिय होईल हे सांगणं कठीणचं आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लिन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत. चेहऱ्यावर थोडी किंवा दाट दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर पाडण्यास उपयुक्त ठरते. पण दाढी वाढवणं जरी सोप वाटत असलं तरीदेखील तिची काळजी घेणं हे तितकचं अवघड आहे. त्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर करतात किंवा सलूनमध्ये जातात. पण घरच्या घरी अगदी कमी पैसे खर्च करूनही तुम्ही दाढी वाढवू शकता आणि तिची काळजीही घेऊ शकता. जाणून घेऊयात दाढीचे केस सुंदर आणि चमकदार बनवण्याचे काही उपाय...

- दाढीची स्वच्छता राखा

डोक्यावरच्या केसांसोबतच चेहऱ्यावरील दाढीचीही स्वच्छता राखणं गरजेचं असतं. दाढीचे केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करू शकता. आठवड्यातून दोन वेळा शॅम्पूने दाढीचे केस धुतल्याने डॅड्रफचा त्रासही होत नाही आणि केसांचा रूक्षपणाही नाहीसा होतो. तसेच दाढीचे केस धुण्यासाठी ठंड पाण्याचा वापर करावा.

- ट्रिमिंग करणंही गरजेचं

पुरूषांमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची दाढी येते. कोणाच्या संपूर्ण गालावर दाढी येते तर काहींच्या संपूर्ण गालावर न येता गालावरच्या काही ठिकाणीच दाढी येते. अशातच आपली दाढी आणि चेहऱ्याचा लूक यानुसार वेळोवेळी दाढी ट्रिम करणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त वाढलेल्या दाढीला शेपमध्ये आणण्यासाठी ट्रिम करणं गरजेचं असतं.

- कंडीशनरचा वपर करा

दाढीचे केस चमकदार बनवायचे असतील तर शॅम्पू केल्यानंतर त्यांना कंडीशनर लावा. यासाठी चांगल्या ब्रँडचा माइल्ड कंडीशनर लावा. दाढीला कंडीशनर लावून 3 ते 4 मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या. 

- डॅड्रफ घालवण्यासाठी अॅलोवेरा जेल

अस्वच्छतेमुळे डोक्यावरील केसांप्रमाणेच दाढीच्या केसांमध्येही डॅड्रफ होण्याची शक्यता असते. डॅड्रफ जास्त करून त्वचेच्या रूक्षपणामुळे होतो. त्यामुळे अॅलोवेराचा वापर त्यावर फायदेशीर ठरतो. थोडं अॅलोवेरा जेल हातावर घेऊन ते दाढीवर लावा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. 
 
- दाढी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलचा उपयोग केल्यानं दाढीचे केस मुलायम होत असून त्यांच्या वाढीसाठीही मदत होते. ऑलिव्ह ऑईलमध्ये मॉश्चराइजरचे गुण असतात. त्यामुळे दाढीच्या केसांमध्ये मुलायमपणा येतो. 

Web Title: home remedies for to take care of beard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.