उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 12:54 PM2018-05-23T12:54:08+5:302018-05-23T13:08:12+5:30

तजेलदार चेहरा मिळवण्यासाठी हे करा उपाय.

home made papaya face pack to get instant glow | उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर

उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर

Next

मुंबई - सध्याच्या जगात सर्वांनाच सर्व गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. मग ते फूड असो किंवा टेक्नोलॉजी... वेल्थ असो वा हेल्थ... तसंच काहीसे सौंदर्याच्याबाबतही आहे. धकाधकीच्या आयुष्यात सर्वांना निखळ सौंदर्य तर हवे आहेच, मात्र तेही इन्स्टंट. तुम्हाला हवे असलेले इन्स्टंट सौंदर्य मिळवण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी दैनंदिन वापरातील गोष्टींपासूनही तुम्ही इन्स्टंट सौंदर्य मिळू शकता.  

पपई या फळापासून निखळ आणि इन्स्टंट सौंदर्य तुम्ही मिळवू शकता. पपई आरोग्यासाठी अत्यंत चांगले फळ आहे. याशिवाय सौंदर्याच्या दृष्टीनंही याचे अनेक लाभ आहेत. 

पपईमध्ये जीवनसत्त्व A, C, D, B12 आणि शरीरासाठी उपयुक्त अशी खनिजं आहेत. पपईचा पॅक चेहऱ्यावर लावल्यास आठवड्याभरात उजळ चेहरा मिळण्यास मदत होते. 

जाणून घेऊया पपईच्या मदतीनं कशी मिळवाल नितळ कांती?

कसा बनवावा पपई फेसपॅक?
- पपईचे छोटे-छोटे तुकडे कापा.
- पपईचे काप आणि पाणी घेऊन मिक्सरमध्ये त्याचे मिश्रण तयार करा. 
- पपईची पेस्ट तयार होईल.
- पपईची पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावावी.   
- कमीत कमी 20 मिनिटांपर्यंत पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी आणि पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

फेस पॅकमध्ये या गोष्टींचाही करू शकता समावेश
कोरडी त्वचा - तुमची त्वचा कोरडी किंवा रुक्ष असल्यास पपई व पाण्यामध्ये थोडेशी हळद मिसळा आणि फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावावा.

मुरुमं (पिम्पल्स) - चेहऱ्यावर मुरुमं असल्यास पपई, मध, लिंबू आणि पाणी एकत्र मिसळून फेस पॅक तयार करावा. 

चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास पपईमध्ये संत्र्याचा रस मिसळावा आणि त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा.

Web Title: home made papaya face pack to get instant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.