आरोग्य, फिटनेस वाढविणारे गॅजेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2016 08:42 AM2016-02-12T08:42:53+5:302016-02-12T01:42:53+5:30

आॅफिसमध्ये बसून आरोग्याची काळजी घेता येईल का, याचा शोध काही जण घेत असतात. त्यांच्यासाठी खालील गॅजेट्स उपयोगाचे ठरू शकतात. 

Health, Fitness Gadgets | आरोग्य, फिटनेस वाढविणारे गॅजेट्स

आरोग्य, फिटनेस वाढविणारे गॅजेट्स

Next
ong>आरोग्य आणि फिटनेस हेआजच्या काळातील महत्त्वाचे विषय झाले आहेत. कारण, आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. लोकांना स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. आर्थिक चक्र त्यांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडते आहे. अशावेळी आॅफिसमध्ये बसून आरोग्याची काळजी घेता येईल का, याचा शोध काही जण घेत असतात. त्यांच्यासाठी खालील गॅजेट्स उपयोगाचे ठरू शकतात. 



मोटोराला मोटोअ‍ॅक्टिव्ह
मोटोअ‍ॅक्टीव्हमध्ये एका छोट्याशा उपकरणात फिटनेस ट्रॅकर आणि एमपीथ्री प्लेअर बसविलेला आहे. यामध्ये बसविलेल्या अचूक तंत्रज्ञान आणि जीपीएस ट्रॅकमुळे वेळ, अंतर, वेग, जळणाºया कॅलरीज आणि हृदयाचे ठोके मोजता येतात. धावणे, सायकलिंग, गोल्फ आणि इतर ४० कामांसाठी तुम्ही तुमची क्षमता मोजू शकता. एमपीथ्रीमध्ये ८ जी. बी. मेमरी आहे, त्यातून तुमच्या आवडीची ४००० गाणीही ऐकू शकता.



आयपॅड नॅनो
हे अत्यंत कामाचे गॅजेट आहे. फिटनेस ट्रॅकर आणि अ‍ॅक्सेसरीजबाबतचा सध्या त्याचा सातवा टप्पा आहे. तुमच्या बुटांना सेन्सॉर अथवा रिसीव्हर बसविण्याची गरज नाही. तुमच्या पायातील अंतर, पाऊले, वेळ आणि जळणाºया कॅलरीज याद्वारे मोजता येतात. ब्ल्यू टूथ टेक्नॉलॉजीचा यात वापर करण्यात येतो. तुमच्या हृदयाचे ठोके वायरलेस पद्धतीने मॉनिटर करता येतात अथवा हेडफोनद्वारे मोजता येतात. तुमचा व्यायाम संपल्यानंतर आयपॉड नॅनो तुमच्या दिवसभराच्या कामाची माहितीही देत असतो.



पिअर स्क्वेअर वन
हे गॅजेट तुमच्या धावण्याचा प्रशिक्षक म्हणून तुमच्या खिशात राहते. हे छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. अगदी आयपॉड नॅनोच्या आकाराचे. दिवसभराच्या तुमच्या कामाच्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन करता येतो. तुम्ही ज्यावेळी बाहेर असता त्यावेळी तुमच्या कामाची आकडेवारी, मार्गदर्शन करण्यासाठी छोटेसे बटन यात आहे.



एक्सबॉक्स ३६० किनेक्टसह

मायक्रोसॉफ्टने डिजिटल गेमिंगची संकल्पनाच बदलली आहे. तुमच्या हालचाली आणि तुमची कामगिरी यावरुन तुमची क्षमता दर्शविते. ज्यावेळी तुम्ही किनेक्ट सुरू करता, त्यावेळी तुमचे शरीर त्याच्या ताब्यात घेते. घरी हा प्रयोग करता येतो. 



ट्रेकडेस्क
 कामात असताना व्यायाम करता, तेव्हा तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते. तुमच्या दिवसाचा अधिकचा वेळ न घेता ट्रेकडेस्कसोबत तुम्ही धाऊ शकता. ट्रेकडेस्क ट्रेडमिल डेक्स तुम्हाला तंदुरुस्त बनविते. या ठिकाणी तुम्हाला हळूवार चालता येते.



यूवॉटरजी ४
फिटनेस टेक्नॉलॉजीच्या या तंत्रज्ञानात अत्यंत लहान आकाराचे हे उपकरण तुम्ही गॉगल्स, हेडबँड, आर्मबँड आणि स्वीम बेल्ट कुठेही वापरू शकता. केवळ प्ले बटन दाबा आणि याचा अनुभव घ्या.



नाईकीप्लस फ्युएलबँड
आयुष्य म्हणजे एकप्रकारचा खेळच. नाईकीप्लस फ्युएलबँड तुमच्या रोजच्या कार्यक्रमांचे मोजमाप करते आणि त्याला नाईकीफ्युएलमध्ये रुपांतरीत करते. धावणे, चालणे, नृत्य, बास्केटबॉल खेळ आणि रोजच्या अशा अनेक कार्यक्रमांमध्ये तुमचा उत्साह वाढवते.

Web Title: Health, Fitness Gadgets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.