पायांच्या दुर्गंधीपासून अशी मिळवा सुटका; या टिप्समुळे इमेजला बसणार नाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:17 PM2019-05-02T16:17:56+5:302019-05-02T16:24:53+5:30

उन्हाळ्यामध्ये घाण येणं अत्यंत साधारण गोष्ट आहे. खासकरून तेव्हा जेव्हा पायांमध्ये शूज वेअर केलेले असतील आणि पायांना येणारा घाम दुर्गंधीचं कारण बनत असेल तेव्हा.

Hacks to deal with smelly feets in summer | पायांच्या दुर्गंधीपासून अशी मिळवा सुटका; या टिप्समुळे इमेजला बसणार नाही फटका

पायांच्या दुर्गंधीपासून अशी मिळवा सुटका; या टिप्समुळे इमेजला बसणार नाही फटका

Next

उन्हाळ्यामध्ये घाण येणं अत्यंत साधारण गोष्ट आहे. खासकरून तेव्हा जेव्हा पायांमध्ये शूज वेअर केलेले असतील आणि पायांना येणारा घाम दुर्गंधीचं कारण बनत असेल तेव्हा. शूज काढल्यानंतर अनेकदा या दुर्गंधामुळे लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी एक पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये शूज घालणं शक्यतो टाळावं. परंतु यामुळे टॅनिंगची समस्या होऊ शकते. तसेच तुमच्या ऑफिसमध्ये शूज कंपल्सरी असतील तर हा पर्याय निवडूही शकत नाही. अशा द्विधा परिस्थितीमध्ये तुम्ही काही टिप्सच्या मदतीने समस्या दूर करू शकता. 

शूजमध्ये न्यूजपेपर ठेवा 

शूजच्या आतील बाजूला न्यूजपेपर लावून ठेवा. हे काही दिवस असचं ठेवा. न्यूजपेपर शूजमदील मॉयश्चर आणि दुर्गंध शोषून घेतो. तुम्ही न्यूजपेपरमध्ये परफ्यूम किंवा डियो स्प्रे करून त्यांना शूजमध्ये ठेवू शकता. 

लेव्हेंडर ऑइल करेल कमाल

लेव्हेंडर ऑइलमध्ये अॅन्टी-फंगल प्रॉपर्टीज असतात. कोमट पाण्यामध्ये2 ते 3 थेंब लेव्हेंडर इसंशल ऑइल एकत्र करा आणि त्यामध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी त्यामध्ये पाय बुडवून ठेवा. काही दिवसांपर्यंत दररोज असं करा. 

(Image Credit : Medipod)

पावडर 

शूज काढल्यानंतर त्यामध्ये पावडर टाका. वेअर करण्याआधी पायांना पावडर लावा. 

व्हिनेगरमुळे मरतील बॅक्टेरिया 

पाय धुताना अॅन्टी-बॅक्टेरियल साबणाचा वापर करा. पाय व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यामध्ये अॅन्टीपरस्पिरॅट एकत्र करा. पायांना व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून धुतल्याने बॅक्टेरिया मरतात. 

मोजे दरोज बदला 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एक जोडी मोजे एक दिवसापेक्षा जास्त वेअर करू नका. मोजे दररोज बदला आणि स्वच्छ मोजेच वापरा

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Hacks to deal with smelly feets in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.