Fitness fund | फिटनेस फंडा

केवळ कलाकारासाठीच नाही, तर प्रत्येकच माणसासाठी फिटनेस आवश्यक आहे. मी रोज सकाळी उठल्यावर किमान पाऊण तास तरी चालून येते. त्याबरोबरच डाएट म्हटलं, तर दर दोन ते तीन तासांनी खाते, पण ते प्रमाणातच आणि आठवड्यातून किमान ३ दिवस तरी एक्सरसाईज करते, तर कधी सायकलिंग करायलाही आवडते. त्याबरोबरच संध्याकाळी ५ वाजताच जेवते आणि रात्रीचे जेवण तर मी वज्र्य केले आहे. अगदीच वाटले, तर दूध पिते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर अनुषापोटी, तोंडही न धुता २ ग्लास पाणी पिते. त्यामुळे रात्रभर आपल्या तोंडात तयार झालेल्या ग्रंथी आपल्या पोटातील विकार, जंतूना मारण्यासाठी उपयोगी असतात. खरंतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजेत. परंतु, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, त्यामुळे ते जमतेच असे नाही. पण जेवढे शक्य होईल तेवढय़ा गोष्टी तरी फॉलो करायला पाहिजेत, असे मला वाटते.
Web Title: Fitness fund
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.