मिस इंडिया अनुकृती वास फिट आणि स्लिम फिगरसाठी करते हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 03:46 PM2018-06-20T15:46:30+5:302018-06-20T15:46:30+5:30

अनुकृतीबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात येत आहेत. अशातच तिच्या फिटनेसचं आणि हॉट फिगरचं गुपित समोर आलं आहे. 

Femina Miss India Anukreethy Vas workout routine, diet, fitness, secrets and more | मिस इंडिया अनुकृती वास फिट आणि स्लिम फिगरसाठी करते हे काम!

मिस इंडिया अनुकृती वास फिट आणि स्लिम फिगरसाठी करते हे काम!

मुंबई : फेमिना मिस इंडिया 2018 चा किताब जिंकणारी तामिळनाडूची अनुकृती वास सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अनुकृतीबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात येत आहेत. अशातच तिच्या फिटनेसचं आणि हॉट फिगरचं गुपित समोर आलं आहे. 

19 वर्षीय अनुकृती सुंदर असण्यासोबतच हेल्डी आणि फिटही आहे. तिच्या फिगरचीही चर्चा केली जात आहे. अनुकृती ही तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. त्यामुळे आता ती तरुणींसाठी आयडॉल ठरत आहे. तरुणींना तिच्यासारखं फिगर हवं आहे. पण त्यासाठी शिस्त आणि काही नियम फॉलो करणं गरजेचं आहे. 

अनुकृतीने सांगितले की, तिच्या फिटनेसमध्ये रुटीनमध्ये डान्सचाही समावेश आहे. ज्याचा तिच्या फिटनेसमध्ये तिला फायदा होतो. 

हे आहे फिटनेसचं गुपित

एका मुलाखतीत अनुकृतीने सांगितले की, तिला डान्स खूप आवडतो. डान्स हा असं एक वर्कआऊट आहे ज्यामुळे हेल्दी आणि फिट राहण्यास मदत मिळते. इतकेच नाहीतर अनुकृती ही स्टेट लेव्हलती अॅथलेटही आहे.

ती म्हणाली की, 'मॉडलिंग करणे हे सतत माझ्या टारगेटवर होते. त्यासाठीच मी इतकी मेहनत घेत आहे. मॉडेलिंगसाठी फिटनेसची काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे मी माझ्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असते'.

अॅडव्हेंचरचीही आहे आवड

अनुकृतीला केवळ खेळ किंवा फिटनेसच नाहीतर अॅडव्हेंचरही आवडतं. तिल बाईक चालवण्याची खूप आवड आहे. अनुकृतीला सुपरमॉडल व्हायचं आहे. त्यासोबतच सिनेमातही काम करायचं आहे. 

Web Title: Femina Miss India Anukreethy Vas workout routine, diet, fitness, secrets and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.