Fashion: Yami Gautam likes the classic fashion! | ​Fashion : यामी गौतमची क्लासिक फॅशनला पसंती !

काबिल चित्रपटाची नायिका यामी गौतम आपल्या सिंपल स्टाइलसाठी ओळखली जाते. विशेषत: यामीला प्रत्येक ऋतूत फॅशनेबल कपडे परिधान करणे आवडते, मात्र ती क्लासिक कपड्यांना कधी नकार देत नाही.  

यामीने आजच्या तरुणींसाठी फॅशनच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. 
* एक चांगल्या क्वालिटीचे पांढरे टी-शर्ट प्रत्येक तरुणीजवळ असावे. याला स्क र्ट, पलाजो किंवा जिन्ससोबत परिधान केला जाऊ शकते, ज्यामुळे आपणास क्लासिक लूक मिळेल. व्हाइट क्रू नेक वाले टी-शर्ट कोणत्याही तरुणीला शोभून दिसते. 

* फुटवेअरचा विचार केला तर न्यूड पम्प्स सबेस आणि वर्सेटाइल हा पर्याय उत्तम आहे. आपण याला टी-शर्ट, स्कर्ट किंवा अन्य कोणत्याही ड्रेससोबत परिधान करु शकता.  

* स्कीनी कपड्यांचा सध्या खूपच ट्रेंड सुरु आहे आणि ते सहज उपलब्धही होतात. आपल्या वार्डरॉबमध्ये या कपड्यांचा अवश्य समावेश असावा. मुलींनी याचा वापर जिन्ससोबत केल्यास अधिक स्टायलिश दिसू शकता. विशेषत: क्रॉप्ड जिन्स परिधान केल्यास प्रत्येक आकाराच्या शरीरास आक र्षक वाटते.  

* कामावर जाण्यासाठी किंवा रात्री मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी आपल्या लूकला सूट होईल अशी क्लासी बॅग जवळ ठेवा. त्यात आपण शोल्डर बॅग किंवा टोट्स, टॅन किंवा बीज किंवा लेदर बॅगचा वापर करु शकता.  

* यामीला ज्वेलरी जास्त आवडत नाहीत, मात्र प्रत्येक तरुणीला आपला लूक आकर्षक वाटण्यासाठी काही खास अ‍ॅक्सेसरीज ठेवायला हव्यात. त्यात एक मोठी गोल्ड वॉच (घड्याळ) परिधान करा. यामुळे आपणास एक आकर्षक लूक मिळेल.  

Also Read : ​Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !
                    : See Pic : ​‘तेरे नाम’च्या १४ वर्षानंतर भूमिका चावला कशी दिसते ?
                     

Web Title: Fashion: Yami Gautam likes the classic fashion!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.